पैठण तालुक्यातील वाहेगाव सोसायटी चेअरमन व्हाईसचेअरमण निवड बिनविरोध

0

पैठण,दिं.१५:पैठण तालुक्यातील वाहेगाव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी अशोक सखाराम बोबडे तर व्हाईस चेअरमनपदी अप्पासाहेब चंद्रभान शिंदे यांची शुक्रवार (दिं.१४) रोजी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री वानखेडे,गटसचिव रविंद्र देवरे यांनी जाहीर करताच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करून जेसीबीच्या साहाय्याने गुलालाची उधळण नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन सह संचालक मंडळ यांच्यावर करण्यात आली

      यावेळी संचालक  लहू बोबडे,राजु बोबडे, अंबादास बोबडे, रमेश बोबडे, कृष्णा घोडके, शांताबाई बोबडे,मिरा बोबडे, भगवान सोनवणे, अशोक काकडे,रामा मिसाळ उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित चेअरमन अशोक बोबडे,व्हाईस चेअरमन अप्पासाहेब शिंदे सह संचालक यांचा फेटा बांधून ग्रामस्थांनी सत्कार केला यावेळी माजी पोलीस पाटील बंडू हरीचंद्र बोबडे,खरेदी विक्री संघाचे माजी व्हाईस चेअरमण निवृत्ती बोबडे,कल्याण बोबडे, बबन नवले,माजी सरपंच लक्ष्मण बोबडे, बापुराव बोबडे, कैलास बोबडे,हारूण बागवान,आशिष शेळके,प्रल्हाद घोडके,मैनुभाई बागवान, संतोष सोनवणे सह आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here