पैठण तालुक्यातील संत एकनाथ सचिन घायाळ शुगरचा गळीत हंगाम बाॅयलर पुजन संपन्न.

0
फोटो : पैठण : श्री संत एकनाथ सचिन घायाळ शुगर पैठण गळीत हंगाम २०२२-२३ चा शुभारंभ सोमवार (ता.१४) रोजी श्री संत एकनाथ सचिन घायाळ शुगर पैठण येथे गळीत हंगाम २०२२-२३ चे बॉयलर पुजन तसेच मोळी टाकण्याचा कार्यक्रम महंत हभप कैलासगिरी महाराज मठाधिपती श्री दत्त संस्थान सावखेडा व पैठण तालुक्यातील सर्व सभासद शेतकरी व नागरीकांच्या यांच्या उपस्थीतीत उत्साहात पार पडला.(छायाचित्र : दिलीप गायकवाड)


पैठण,दिं.१५ : श्री संत एकनाथ सचिन घायाळ शुगर पैठण गळीत हंगाम २०२२-२३ चा शुभारंभ सोमवार (ता.१४) रोजी श्री संत एकनाथ सचिन घायाळ शुगर पैठण येथे गळीत हंगाम २०२२-२३ चे बॉयलर पुजन तसेच मोळी टाकण्याचा कार्यक्रम महंत हभप कैलासगिरी महाराज मठाधिपती श्री दत्त संस्थान सावखेडा व पैठण तालुक्यातील सर्व सभासद शेतकरी व नागरीकांच्या यांच्या उपस्थीतीत उत्साहात पार पडला . 

    यावेळी श्री संत एकनाथ सचिन घायाळ शुगर प्रा.लि. चे चेअरमन सी.ए. सचिन भैय्या घायाळ , राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते दत्ताभाऊ गोर्डे ,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद तांबे , माजी चेअरमन अंकुशराव रंधे , किशोर चौहान , डॉ . भारत झारगड , ह.भ.प. सुधाकर महाराज वाघ तसेच गोपीनाना गोर्डे ( व्हाईस चेअरमन ) , संचालक अक्षय भाऊ शिसोदे , विक्रम काका घायाळ , दत्तात्रय पाटील आमले , प्रल्हाद औटे , कचरु बोबडे , हरिभाऊ मापारी , मुक्ताबाई डिगंबर गोर्डे , आबासाहेब पाटील मोरे , रमेश क्षिरसागर , अशोक एरंडे ,माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ जाधव , अनिल रोडे , संतोष गोबरे , हरिपंडित नवथर , आरेफ पठाण , चंद्रकांत झारगड , विलास तुपकरी , राजेंद्र गाभुड पाटील, अनिल जगताप , गणेश बोंबले , एजाज शेख , सुनिल चितळे , वसंत ठोंबरे , कल्याणराव खोडे , बद्री गोर्डे , कैलास फासाटे , शरद जाधव , माणिक थोरात , सुखदेव थोरात , गणेश पवार, कृष्णा भुकेले , सुनिल कातबने , सोमनाथ मोरे , ताराचंद नवथर , विजुभाऊ बोबडे , विशाल थोटे , रवि धोटे , राजु नवथर , राजु बोबडे , भरत खोंडे , भगवान खाटिक , योगेश रोडे , सुशिल बोडखे पाटील , शिवाजी जाधव , विष्णु लाटे , अजय करकोटक , जितु परदेशी , समीर पटेल, प्रभुराम जाधव , एकनाथ नवले , भाऊसाहेब पिसे , भरत थोटे , गणेश घायाळ , बाबासाहेब गिरगे , योगेश सोलाट , सुनिल नरवडे , किरण बापु घायाळ , योगेश जोशी , लक्ष्मण बोबडे , आप्पासाहेब गोर्डे , पुंजाराम पातकळ , विक्रम नवले , शहादेव नरवडे , निवृत्ती  बोबडे , राजु मोहिते, बापुराव बोबडे,निकम पाटील सह सभासद , ऊस उत्पादक बागायतदार सर्व अधिकारी व कर्मचारी कामगार व ऊस तोडणी वाहतुक कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थीत होते . 

- बॉयलर अग्निप्रदीपन संगणक विभाग प्रमुख व सभासद रमेश  मुळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ . शारदाताई  मुळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला . याप्रसंगी बोलतांना चेअरमन सी ए सचिन भैय्या घायाळ यांनी सांगितले की , यावर्षी नविन ३२ टन प्रती तास कॅपॅसिटीचे मेव्रन पॅनलचे नविन बॉयलर बसविण्यात आलेले आहे . तसेच स्प्रे पॉन्ड मॉडिफिकेशन , इंजेक्शन पंप्स , इले . मोटर्स , नविन रोटरी ज्युस स्क्रिन सिस्टिम , टिआरपीएफ अशा अनेकप्रकारचे नविन मशिनरी बसविण्यात आलेल्या आहेत व कारखान्याची २६०० मे . टन प्रतीदिन एवढी गाळप क्षमता वाढलेली आहे . तसेच पुढील १ वर्षात कारखाना परीसरात १००००० लि . प्रतिदीन क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारनार असून गळीत हंगाम २०२२-२३ करीता ऊसाचा दर मागील वर्षापेक्षा अधिक चांगला राहिल असे सी ए सचिन भैय्या घायाळ यांनी सांगीतले . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी श्री कदम  यांनी केले कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .

———

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here