पैठण,दिं.१३: पैठण पंचायत समिती मध्ये उमेद अभियान अंतर्गत शासनाच्या आर्थिक समावेशना बाबत एक दिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली.
१५ ऑक्टोबर २०२२ ते २६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत आर्थिक सामावेशाद्वारे सक्षमीकरनाची मोहीम औंरगाबादचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदेशानुसार आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी गटविकास अधिकारी काळुराम बागुल यांनी सांगितले की, आर्थिक समावेशन बाबत ग्रामसेवक यांनी आपल्या गावात जनजागृती करावी व बैक अधिका-यांना अभियान कालावधी मध्ये सर्वोतोपरी सहकार्य करावे यावेळी तालुकास्तरीय विभागप्रमुखासह पंचायत समिती मधील अधिकारी व कर्मचारी सह ग्रामसेवक, सरपंच, राष्ट्रीयकृत बैकेचे व्यवस्थापक उपस्थित होते.