अमरावती : मी पैसे घेऊन जर गुवाहाटीला गेलो असेल तर पैसे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेजी यांनी याचे उत्तर दिले पाहिजे. रवी राणा यांनी माझी बदनामी केली आहे. २०-२० वर्ष आमची राजकिय करिअर उभं करायला गेली आहे. आरपारची लढाई लढायला मी तयार आहे. जिथे म्हणाल तिथे एकटा यायला तयार आहे. काय तोडपानी केलं त्याचे एक तारखे पर्यंत पुरावे द्या आणि आरोप सिद्ध करा. आरोप सिद्ध झाले नाहीत तर मी त्यांच्या घरी भांडे घासेन असे आव्हान आमदार बच्चू कडू यांनी आ. रवी राणा याना दिले आहे. आ कडू पुढे म्हणाले की या संदर्भात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील नोटीस पाठवणार आहे. तुम्ही पैसे दिले असेल तर स्पष्ट करा अशी मागणी या नोटीसद्वारे करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
गुवाहाटीवरुन झालेल्या आरोपांमुळे आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. बच्चू कडू यांनी रवी राणांविरुद्ध थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांची अंतर्गत धुसपूस आता चव्हाट्यावर आली आहे. आ, रवी राणा यांनी आज आमदार बाचूऊ कडू यांच्यावर आरोप करताना म्हटले की आ. कडू हे गुवाहाटीला सेटलमेंट करायला गेले होते . त्यांनी सरकारला पैसे घेऊन पाठिंबा दिला आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना आ. कडू बोलत असते. आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
गुवाहाटी ला जाऊन करोडो रुपये लाटले असा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला होता. या आरोपांवरुनच बच्चू कडू यांनी तक्रार दाखल करत रवी राणा विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
आमदार रवी राणा यांनी आरोप केले तर पुरावे द्यावेत. हे आरोप अत्यंत गंभीर आहेत. एकीकडे मंत्री पद मागता आणि दुसरीकडे रांगेत लागतात.