पोलिस आत्महत्या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात राहुरी पोलिसांची दिरांगाई 

0

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी 

               पोलिस दलातील हवालदार भाऊसाहेब आघाव यांनी स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केल्यानंतर दोन पोलिस अधिकारी, महिला पोलिस कर्मचारी व लिपीकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधितांना आरोपींना अजूनही अटक झालेली नाही. भगवान महासंघ राज्य संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी आघाव कुटुंबियांची भेट घेतली. सानप यांनी राहुरी पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात जाणीव पुर्वक दिरांगाई करीत असल्याने  राज्यभरात वंजारी समाज संघटनेकडून आंदोलन हाती घेणार असल्याचे सांगितले.

                मयत पोलिस हवालदार भाऊसाहेब आघाव यांच्या कुटुंबियांसह नाशिक परिक्षेत्र विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांची भेट घेत आत्महत्या प्रकरणामध्ये जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील, नगर विभागीय पोलिस उपअधिक्षक अजित पाटील व कार्यालयिन अधिक्षक कुसकर यांनाही सहआरोपी करण्याची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी.शेखर पाटील यांनी आरोपींना तात्काळ अटक करून प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.  

           आघाव कुटुंबियांना मनमाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करुन पोलिस कुटुंब पोलिसांकडेच न्याय मागत असल्याने सर्वांच्या नज़रा पोलिसांच्या भुमिकेकडे लागलेल्या असताना अजूनही आघाव आत्महत्या प्रकरणात आरोपी मोकाट आहे. एकाही आरोपीला पकडण्यात आले नसल्याची माहिती मिळाली आहे. गुन्ह्यातील आरोपींकडून अटकपूर्व जामिन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मृत आघाव यांचा मुलगा प्रेम याने आरोपींना अटक न झाल्यास आघाव कुटुंबिय, नातलग व ग्रामस्थांसह नगर मनमाड महामार्गावर रास्तारोको करुन

आत्मदह करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाला दिला आहे.

आघाव कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राज्यात कार्यरत असलेल्या भगवान महार राज्य प्रमुख सानप व त्यांसह भाजपचे राज्याचे प्रवक्त विनोद वाघ यांनी धाव घे होती. प्रकरणामध्ये जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी  आघाव यांचा छळ केला आहे. मृत्युनंतर अधिकाऱ्यांनी आघाव यांच्या मृतदेहाला त्रास दिल्याचा आरोप सानप यांनी केला आरोपींना अटक करा, दोषींचा शोध घेऊ तात्काळ अटकेची कारवाई करण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here