पो. हवालदार आघाव आत्महत्ये प्रकरणी राजुर पोलिस ठाण्याचे स.पो.निरीक्षक साबळे यांच्यासह चौघावर गुन्हा दाखल

0

 पोलिस अधिक्षक पाटील यांनी आघाव यांच्या तक्रीची दखल घेतली असती तर तो पोलिस कर्मचारी वाचला असता 

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

              राहुरी तालुक्यातल्या मुळा डॅम येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस काँस्टेबल भाऊसाहेब आघावच्या आत्महत्येची ‘स्युसाईड नोट’ व्हायरल झाली आणि  त्यांच्या आत्महत्येच्या कारणांचा उलगडा झाला.आत्महत्येनंतर आघाव यांच्या मुलाच्या फिर्यादीवरुन राजुर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे,सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश रामभाऊ निमसे, भाऊसाहेब शिवाजी फुंदे आणि एका महिला पोलिस कर्मचारी आदी विरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी राहुरीचे पोलिस आघाव कुटुंबाला खरोखर न्याय मिळून देतील का? पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी आघाव यांच्या तक्रारीची दखल घेतली असती तर आज माझे वडील जिवंत राहिले असते,आता पोलिस अधिक्षक पाटील माझ्या वडीलांना मरणानंतर तरी न्याय देतील का? असे प्रेमकुमार आघाव याने फिर्याद दाखल केल्या नंतर पञकारांशी बोलताना सांगितले.

            याबाबत सविस्तर माहिती अशी की,पैशाच्या लोभापायी अनेक पोलिस लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले आहेत.पोलिस दलात पोलिसच पोलिसाला पैशासाठी वेठीस धरुन आत्महत्या पर्यंत नेवून ठेवतो हि शरमेने पोलिस दलास मान खाली घालवणारी घटना ठरली आहे.राजकारणात एकमेकांची जिरावाजिरवीचे राजकारण करण्यासाठी विनयभंगाच्या खोट्या फिर्यादी दाखल होताना सर्वांनी पाहिले.परंतू पोलिस दलात चांगले काम करणाऱ्या पोलिसास बदनाम करुन चौकशीचा भुंगा मागे लावण्यासाठी सुपारी घेणाऱ्या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत.त्याचा बळी राहुरी तालुक्यातील बारगांव नांदुर येथिल पोलिस कर्मचारी भाऊसाहेब दगडू आघाव हे ठरले आहे.

              त्या चार पोलिस कर्मचाऱ्यामुळे  पोलीस कर्मचारी भाऊसाहेब आघाव यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला.असे पोलीस कर्मचारी आघाव यांचा २३ वर्षीय मुलगा प्रेमकुमार आघाव याने दिलेल्या फिर्यादीवरुन  दिसून येते.फिर्यादीत प्रेमकुमार याने म्हटले आहे की,माझे वडील पोलिस मुख्यालयात नोकरीवर असताना मुळा धरणाची सुरक्षा करण्यासाठी कर्तव्यावर पाठविण्यात आले होते. मध्यंतरी अकोला येथे माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या बंदोबस्तासाठी गेले असता राजुर पोलिस स्टेशनचे साहय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे हे भेटले व राजुर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या विनयभंगाचा खोटी तक्रार, पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून सुरु असलेली चौकशी यातुन बाहेर काढण्यासाठी साहय्यक पोलिस निरीक्षक साबळे व चौकशी अधिकारी भाऊसाहेब शिवाजी फुंदे यांनी  पैशांची मागणी करुन दबाव आणत असल्यामुळे या सर्वांच्या त्रासाला कंटाळुन माझ्या वडीलास आत्महत्येस प्रवृत्त केल्याने त्यांनी शनिवारी सकाळी 10 वा. सरकारी कर्तव्यावर असतांना सरकारी रायफल मधुन स्वत:वर गोळी झाडुन आत्महत्या केली आहे. प्रेमकुमार आघाव याच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                पोलिस कर्मचारी आघाव अकोले येथिल बंदोबस्तावरुन आल्या नंतर पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांना भेटण्यासाठी गेले. पोलिस अधिक्षक पाटील यांना भेटून साहय्यक पोलिस निरीक्षक  साबळे, फुंदे, निमसे, एक महिला कर्मचारी हे सर्वजण मला दाखल असलेल्या खोट्या विनयभंगाचा गुन्हा व चौकशीतून बाहेर काढण्यासाठी दहा लाख रुपयाची मागणी केल्याची माहिती दिली.परंतू  पाटील यांनी याबाबत चकार शब्द काढला नाही.त्यामुळे आघाव निराश होवून पोलिस अधिक्षक कार्यालयातुन बाहेर पडले.आणि आपल्या मागे कोणी उभे राहु शकणार नाही.असे आघाव यांना वाटत असल्याने थोडे दिवस विचार विनिमय करुन शनिवारी शेवटी सरकारी बंदुकीतून गोळी झाडून घेवून सरकारी पोलिस कर्मचाऱ्याने अखेर आत्महत्या केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे हे करीत आहे.

चौकट

       फुंदे हा पोलीस दलात काळीमा फासणारा, संताप व्यक्त!

              नगर जिल्हा पोलीस कार्यालयात  कार्यरत असलेल्या भाऊसाहेब शिवाजी फुंदे या कर्मचार्‍याने आज पर्यंत पोलिसांविरोधात षडयंञ रचण्यासाठी मोठी भूमिका पार पाडली आहे.जिल्ह्यातील एखाद्या पोलीस कर्मचार्‍याला वरिष्ठांमार्फत विभागीय चौकशी सुरु करण्याची धमकी देवून त्याच्याकडून पैसे उकळणे, रजा मंजूर करण्यासाठी पैशांची मागणी करणं, पैसे न देणार्‍या एखाद्या पोलीस कर्मचार्‍याविषयी वरिष्ठांची कानभरणी करणं, वरिष्ठांना अंधारात ठेवून परस्पर ‘उद्योग’ करणं, या ना त्या कारणातून पोलिस कर्मचाऱ्यांची अडवणूक करीत असल्याची चर्चा राहुरी पोलिस दलात सुरु होती.फुंदे विषयी नगर जिल्हा पोलीस दलात कमालीचा संताप व्यक्त होतो.जिल्हा पोलिस प्रमुख आता तरी फुंदेनी अनेक पोलिसावर केलेल्या अन्यायाला वाचा फोडतील का? 

चौकट

पोलिस दलात पावलोपावली “खल”

          ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ असं ब्रीद असलेल्या नगर जिल्हा पोलीस दलातच असे अनेक ‘खल’ पावलोपावली असल्याचं या घटनेच्यानिमित्तानं पुढे येत आहे. सामान्यांचं संरक्षण करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांचं आर्थिक शोषण करणारे नगर जिल्हा पोलीस दलातले ‘सरकारी बाबू’ प्रामाणिक पोलीस कर्मचार्‍यांच्या जीवावर उठले आहेत.त्या चार पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई होईल तेव्हा होईल.परंतू त्यांचा पैसे कमविण्याचा स्वार्थी आणि हावरटपणामुळे ब नगर जिल्हा पोलीस दलानं एक पोलीस कर्मचारी गमावलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here