*प्रभाकर(आप्पा) जोशी यांचे निधन..

0

कोपरगाव :

येथील भारत प्रेसचे मालक प्रभाकर दत्तात्रयपंत जोशी(वय ८६) यांचे वृद्धापकाळाने गुरुवार दि.२५ ऑगस्ट २०२२ रोजी निधन झाले .

त्यांचे पच्छात पत्नी, तीन मुले,दोन मुली,जावई नातू असा परिवार आहे.भारत प्रेसचे संचालक रविंद्र,संदिप, मिलिंद यांचे ते वडील होत.

स्वातंत्र्यपुर्व काळातील जुने मामलेदार (तहसिलदार) दत्तात्रय जोशी यांचे ते सुपुत्र होते.उत्तर नगर जिल्ह्यातील भारत प्रेस हे पहिले मुद्रणालय दत्तात्रय जोशी यांनी सुरू केले.धार्मिक आणि सामाजिक कार्याबद्दल दत्तात्रय गंगाधरपंत जोशी यांना शंकराचार्य यांनी “धर्मभूषण” या उपाधीने सन्मानित केले होते.धर्मभूषण दत्तात्रय जोशी यांचा सामाजिक सत्कर्माचा वारसा त्यांचे सुपुत्र प्रभाकर जोशी यांनी समर्थपणे चालविला.स्व.प्रभाकर जोशी हे आप्तेष्ट स्नेहपरिवारात “आप्पा” नावाने परिचित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here