येवला – प्रतिनिधी
जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याला नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. कष्ट करण्याची ताकद व इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम उत्कृष्ट प्रकारे करता येते, असे गौरोवोदगार मा. उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी काढले. येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम हायस्कूल व श्रीमान गंगाराम छबिलदास शेठ उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य किशोर जगताप यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच संपन्न झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार प्राचार्य किशोर जगताप दि. 30 सप्टेंबर 2022 रोजी सेवानिवृत्त झाले, त्यानिमित्त त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास संस्थेचे प्रभारी अध्यक्ष रमेशचंद्र पटेल हे उपस्थित होते. नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे, विधान परिषदेचे आमदार नरेंद्रभाऊ दराडे, एन डी सी सी बँकेचे उपाध्यक्ष माणिकभाऊ शिंदे,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुणालभाऊ दराडे,मोहन चकोर, शिक्षण परिषदेचे मा अध्यक्ष दत्तात्रय जगताप व इतर अनेक मान्यवरांनी जगताप सरांच्या शैक्षणिक, सामाजिक व तालुक्यातील अर्थवाहिन्या असलेल्या पतसंस्था यांच्याबाबतीत केलेल्या कार्याचा गौरव केला. विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका रणदिवे चंपा यांनी आपल्या मनोगतातून किशोर जगताप यांची शैक्षणिक वाटचाल सांगतानाच त्यांच्या अंगी असलेल्या विविध गुणांचे वर्णन केले. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सुरेश जोरी, माधवराव गायकवाड, किशोर सोनवणे, राजेंद्र गायकवाड,सोनी पैठणीचे संचालक श्रीनिवासशेठ सोनी, मा प्राचार्य दत्तात्रय नागडेकर यांनी मनोगतातून किशोर जगताप यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमास रमेशचंद्र पटेल यांनी मनोगतातून जगताप सरांच्या कार्याचा गौरव करताना त्यांचे अध्यापन, तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य वर्णन केले. तसेच शिक्षकांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी तालुक्यात पतसंस्था सुरू करून शिक्षकवर्गाची आर्थिक सोय करून दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.
जगताप सरांच्या सहचारिणी सौ मंगल जगताप व त्यांच्या स्नुषा सौ योगिता जगताप यांनी त्यांच्या मनोगतातून सरांच्या कौटुंबिक जबाबदारी सांभाळून प्राचार्य पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली
सत्कारमूर्ती श्री. किशोर जगताप, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मंगल जगताप व त्यांची कन्या कु. श्रेजल यांचा सत्कार साहेबांच्याहस्ते करण्यात आला तसेंच साहेबांचा सत्कार संस्थेचे प्र. अध्यक्ष रमेशभाईच्या हस्ते करण्यात आला
याप्रसंगी जगताप सरांची कन्या कु श्रेजल हिचाही वाढदिवस साहेबांच्या उपस्थित साजरा करण्यात आला., संस्थेचे माजी सेक्रेटरी प्रफुल्ल गुजराथी, संचालक सचिन कळमकर, माध्यमिक सोसायटीतर्फे अध्यक्ष सुरेश जोरी, सचिव अनिल शेलार यांनी, माधवराव नागडेकर सोसायटीतर्फे विजय साळुंके, पुष्पा कांबळे यांनी, धामणगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब वाबळे, विद्यालयाच्या सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी प्राचार्य किशोर जगताप यांचा सत्कार केला.
प्राचार्य किशोर जगताप सर यांनी सत्काराला उत्तर देताना संस्था, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर सहकारी, तसेच सहकार्य केलेल्या सर्वांप्रति ऋण व्यक्त केले. त्याप्रसंगी त्यांना भावना अनावर झाल्या. सेवानिवृत्तीनंतर शाळेला व संस्थेला कधीही गरज भासली तर सहकार्यासाठी सदैव तयार असेल असे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमास संस्थेचे माजी सेक्रेटरी प्रफुल्ल गुजराथी, संचालक सचिन कळमकर, डॉ राजेश पटेल, मकरंद सोनवणे, जिल्हा परिषदेचे सदस्य महेंद्रशेठ काले, भाजपचे जिल्हा अध्यक्ष आनंद शिंदे, मा प्राचार्या विजयाताई गुजराथी व तालुकाभरातील बहुसंख्यने सहकारी, आप्तेष्ट नातेवाईक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर सोनवणे यांनी केले, तर आभार विशाल कळमकर यांनी मानले.