संगमनेर : अमृतवाहिनी तंत्रनिकेतन मधील जिमखाना विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. सुनील अंबरनाथ सांगळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून हँडबॉल खेळातील राज्यस्तरीय स्पर्धेतील ज्युनिअर खेळाडूंचे आक्रमण कौशल्य या विषयावर पीएचडी मिळाली आहे.
संगमनेर महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रा.अंबरनाथ सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.सुनील सांगळे यांनी क्रीडा विभागातून पद्युत्तर शिक्षण पूर्ण केले. याचबरोबर अमृतवाहिनी तंत्रनिकेतन मध्ये जिमखाना विभागाची जबाबदारी सांभाळताना हँडबॉल, क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी या विविध स्पर्धांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना राज्य व विभागीय पातळीवर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी तंत्रनिकेतनला क्रीडा स्पर्धेतील विविध पुरस्कार मिळाले आहेत. याचबरोबर सातत्याने सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि प्रत्येकाच्या मदतीला सातत्याने धावून येणारे लोकप्रिय व्यक्तिमत्व असा त्यांचा संगमनेरमध्ये लौकिक आहे. त्यांनी हँडबॉल खेळात विशेष प्राविण्य मिळवले असून हँडबॉल खेळातील कनिष्ठ गटांच्या राज्यस्तरीय स्पर्धा दरम्यान खेळाडूंकडून वापरल्या जाणाऱ्या आक्रमण कौशल्याच्या विश्लेषात्मक अभ्यास हा प्रबंध सादर केला होता. या प्रबंधाला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड यांनी मान्यता दिली असून त्यांना पीएचडीने गौरवले आहे. यासाठी त्यांना लातूर येथील जनक्रांती महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक डॉ राजेश कारंजकर यांचे मार्गदर्शन लाभले.डॉ. सुनील सांगळे यांना मिळालेल्या पीएचडी बद्दल काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, सत्यजित तांबे ,रणजीतसिंह देशमुख, सौ. शरयूताई देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य प्रा. व्ही .बी. धुमाळ, जिमखाना विभागाचे प्रा. बाळासाहेब शिंदे, प्रा. अंबरनाथ सांगळे, पी. वाय. दिघे, प्रा. विजय वाघे ,प्रा. सुनील मंडलिक, प्रा. प्रवीण थोरात ,डॉ प्रदीप देशमुख, सौ. सुभद्राताई सांगळे, सौ. शारदाताई सुनील सांगळे, भाऊसाहेब आंधळे, सरपंच नितीन सांगळे, गणपतराव सांगळे यांच्यासह संगमनेर मधील सर्व क्रीडा संघटना, क्रीडाप्रेमी व विविध क्रीडा खेळाडूंसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.