फेक बातमीने थोरात कारखान्यांच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली ; कारखान्याचा सबंध नाही – घुगरकर

0

संगमनेर / चंद्रकांत शिंदे पाटील 

संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याकडे ऊस तोडणी साठी येत असणाऱ्या मजुरांच्या ट्रकला अपघात झाला असून त्यात अनेक जणांचा मृत्यू झाल्याचा व्हिडिओ मंगळवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर  प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. थोरात कारखान्याशी सबंध जोडून व्हिडिओ व्हायरल झाल्याने कारखान्याच्या अधिकारी वर्गाची काही काळ झोप उडाली.                                                                                   याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ (दादा) घुगरकर यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता सदरच्या व्हिडिओशी थोरात कारखान्याचा कुठलाही संबंध नाही. अशी कुठलीही घटना कारखान्याशी संबंधित असती तर मुकादमाने कारखाना व्यवस्थापनाला कळवले असते. असे सांगून कोणीतरी खोडसाळपणे थोरात कारखान्याच्या नावाचा उल्लेख करून व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या  व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आली आहे.

         मंगळवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत ट्रॅक्टर ट्रॉली पाण्यात पडल्याचे दिसत असुन यात महिला आणि लहान मुले दगावल्याचे दिसत आहे. काही लोक आणि पोलीस या अपघातात जखमी आणि मृत झालेल्या लोकांना बाहेर काढत असतानाचे या व्हिडिओतून दिसत आहे. सदरचा व्हिडिओ व्हाॅट्सअपवर अनेक ग्रुप वर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि तो व्हायरल करणाऱ्यांनी या व्हिडिओच्या खाली संगमनेरच्या थोरात सहकारी साखर कारखान्यावर ऊस तोडणी साठी जात असणाऱ्या मजुरांच्या वाहनाला अपघात झाला असा मथळा जोडला. ही बाब कारखाना व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यावर आणि यात थोरात कारखान्याचा संबंध जोडलेला असल्याने मंगळवारी रात्री साखर झोपेत असणाऱ्या कारखान्याच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मध्यरात्री अधिकाऱ्यांनी एकमेकाला फोनाफोनी करून झोपेतून जागे केले. तसेच कारखान्याच्या काही अधिकाऱ्यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ(दादा)घुगरकर यांना संपर्क साधत व्हायरल झालेल्या व्हिडिओ बाबत माहिती दिली. त्यावर कार्यकारी संचालक आणि इतर अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ बारकाईने पहात याबाबत खातरजमा केली. आणि त्यांच्या निष्कर्षातून हा व्हिडिओ आपल्या राज्यातील नसून दुसऱ्या कुठल्यातरी राज्यातील असल्याची खात्री पटली. तसेच अपघातग्रस्त लोक थोरात कारखान्यावर ऊस तोडणीसाठी येणार असल्याची बातमी ही फेक बातमी असल्याचे निष्पन्न झाले. मात्र दरम्यानच्या काळात कारखाना व्यवस्थापनाची प्रचंड मोठ्या प्रमाणात धावपळ उडाली. मात्र थोरात कारखान्याचा कुठलाही संबंध नसल्याने अधिकारी वर्गाने सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या फेक बातमीने वैतागलेल्या अधिकाऱ्यांनी थोरात कारखान्याचा उल्लेख करून हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here