बँकेला समृद्ध व अद्ययावत करण्यासाठी काम करणार येवला मर्चंट बँकेच्या निवडणुकीसाठी समृद्धी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

0

येवला प्रतिनिधी 

येवला मर्चंट बँकेला अद्यावत व समृद्ध करण्यासाठी समृद्धी पॅनलची निर्मिती केली आहे. बँकेची थकबाकी वसूल करून 0 टक्के एनपीए वर आणणे,बँकेच्या शाखा अध्यवात करणे हेच समृद्धी पॅनलचे ध्येय असल्याची माहिती पॅनलचे नेते,मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष मनीष काबरा,माजी उपाध्याक्ष राजेश भांडगे,माजी उपनगाध्यक्ष सुरज पटनी व विकर्णसिंग परदेशी यांनी दिली.

येवल्याच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका निभवणाऱ्या येवला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला असून १३ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.यासाठी समृद्धी पॅनलने शहरातील जागृत गणपती मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला.यावेळी पॅनलच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली.यावेळी उपमहाराष्ठ केशरी राजेंद्र लोणारी,ज्येष्ठ संचालक धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी श्रीफळ वाढवत व पॅनलच्या प्रचार पत्रकाचे अनावरण करण्यात आले. 

मर्चंट बँकेला टेक्नॉलॉजीत प्रगतीत अद्यावत व समृद्ध करण्यासाठी समृद्धी पॅनलची स्थापना केली असून सर्वसमावेशक उमेदवारांना स्थान देण्यात आले आहे.बँकेच्या नव्या शाखा सुरू करण्यासह ग्राहक हिताच्या सुविधा देण्यासाठी आम्ही बांधील राहू.बँकेची थकबाकी वसूल करून 0 टक्के एनपीएवर आणणे,बँकेच्या शाखा अध्यवात करणे,गरज असेल तिथे बँक शाखा उघडुन व्यवसाय वाढविणे,ज्येष्ठ सभासदांना घारपोहच बँकिंग सुविधा देणे

आणि इतरही सेवा देण्याचा आमचा मानस आहे.आपली बँक ही पुन्हा एकदा जिल्ह्यात सर्वात उत्तम बँक म्हणून नावारूपास आणण्यासाठी आमचा मानस असल्याचे यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुरज पटणी यांनी म्हटले.बँकेला वेळ देऊ शकणारे,चांगला विचाराचे व अभ्यासू उमेदवारांना आम्ही संधी दिली आहे.त्यामुळे मतदारही नक्कीच आम्हाला संधी देतील.बँकेचे हित हेच आमचे ध्येय असून व्यापारी बांधवांचे अधिक हित साधण्यासाठी आम्ही काम करू असे मनीष काबरा यांनी सांगितले.

जेष्ठ संचालक धनंजय कुलकर्णी यांनी सर्वपक्षीय सर्वसमावेशक पॅनल निर्मिती केल्याने सर्व स्तरातून स्वागत होत असल्याचे सांगितले.

यावेळी पॅनलचे उमेदवार जाहीर करण्यात आले.सर्वसाधारण गटातून सौ.पूजा काबरा पुजा,महेश भांडगे, श्रीमती सोनल पटणी,विकर्णसिंग परदेशी,शरद लहरे,अजय सोमाणी, चंद्रकांत कासार,सुहास भांबारे,डॉ.महेश्वर तगारे,अल्केश कासलीवाल हे रिंगणात आहेत.इतर मागासवर्गीय गटातून प्रज्वल पटेल,भटक्या विमुक्त जाती गटातून सारिका दिवटे,महिला राखीव गटातून छाया देसाई,सोनल परदेशी,अनुसुचित जाती जमातीतून सुभाष गांगुर्डे हे रिंगणात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here