कोपरगांव (वार्ताहर)
दिवाळी सणाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने ‘ आनंदाचा शिधा ‘ वाटप करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून अन्न सुरक्षा पुरवठा आणि अंत्योदय यादीत नाव असेलल्या रेशन कार्ड धारकांनी आपला शिधा दुकानात प्रत्यक्ष येऊन घेऊन जावे . असे आवाहन रेशन दुकान मालक उल्हास पवार यांनी केले आहे. यावेळी पवार यांच्या हस्ते यादीतील रेशन धारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला.
दिवाळी सण आनंदात साजरा करता यावा या उद्देशाने शिंदे – फडणवीस सरकारने गोरगरीब जनतेसाठी शंभर रुपयात रवा, साखर, हरबरा दाळ आणि गोडेतेल या वस्तू ‘आनंदाचा शिधा ‘ म्हणून देण्याची घोषणा केली होती. आधार पवार स्वस्त धान्य दुकानामार्फत हा शिधा परिसरातील लाभार्थ्यांना नुकताच वितरीत करण्यात आला.
सद्याच्या महागाईच्या काळात गोरगरीब जनतेला रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. ही जाणीव ठेवून शिंदे – फडणवीस सरकारने चार वस्तू अवघ्या शंभर रुपयामध्ये देवून दिवाळी गोड केलेली आहे. सर्वसामान्य जनतेला यातून मोठा आधार मिळालेला आहे. ‘आनंदाचा शिधा ‘ हातात पडल्यावर गोरगरीबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत करुन सरकरला धन्यवाद दिलेत. यावेळी उल्हास उर्फ बापू पवार , सुशांत कानडे आदी उपस्थित होते.