बाभुळगावच्या एसएनडी कॅम्पसमधील जगदंबा माता मंदिरात नवरात्र महोत्सवाची धूम 

0

येवला, प्रतिनिधी 

 बाभुळगाव येथील जगदंबा व मातोश्री शिक्षण संस्थेच्या एसएनडी शिक्षण संकुलाच्या प्रांगणात उभारलेल्या जगदंबा मातेच्या भव्य मंदिरात यावर्षी नवरात्र उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने नऊ दिवस विविध धार्मिक उपक्रम व कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे अनेक सणांवर निर्बंध लादण्यात आले होते.मात्र,आता सगळे सण निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा करता येणार असल्यामुळे भाविकांमध्ये देखील आनंदाचं,उत्साहाचं वातावरण असल्याने 

एसएनडी कॅम्पसमध्ये संतोषीमाता, रेणुका माता व जगदंबा मातेच्या भव्य मंदिरात प्रथमच जल्लोषात नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे,सचिव लक्ष्मण दराडे,माजी नगराध्यक्ष रामदास दराडे आदींच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात आले.नवरात्र उत्सवानिमित्ताने दररोज सकाळ-संध्याकाळ महाआरती,भजन, महाप्रसाद व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या मंदिरात परंपरागत पद्धतीने धार्मिक विधी पूर्ण करून नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला. मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली. आकर्षक विद्युत रोषणाई,मंडप,फुलांच्या माळांनी देवी मंदिर सुशोभित करण्यात आले होते.दररोज सकाळी ८ वाजता व सायंकाळी ६ वाजता देवी मंदिरात मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.आमदार डॉ.सुधीर तांबे,जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.मच्छिंद्र कदम,समीरसिंग साळवे,पोलिस निरीक्षक भगवान मथुरे,अनिल भवारी,नोंदणी निरीक्षक श्री.गायकवाड,सोनी पैठणीचे संचालक श्रीनिवास सोनी,योगेश शूळ,ज्ञानेश्वर दोडे,शिक्षक नेते बाळासाहेब मोरे,गंगाधर पवार,मनोज भागवत,प्राचार्य शरद ढोमसे,किशोर जगताप,सुनील भावसार,सुनील लककडकोट,प्रितम पटणी,जयवंत खाबेकर,सरपंच सुभाष वाबळे,शरद बोरणारे,संगीता गायकवाड आदी आरतीसाठी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या माजी आरोग्य सभापती सुरेखा नरेंद्र दराडे,मातोश्री  संस्थेच्या संचालिका मीनाताई किशोर दराडे,प्रितीबाला पटेल,संगीता पटेल, आश्लेषा गुजराथी,अमृता गुजराथी व मृगया गुजराथी आदींची प्रमुख उपस्थिती होती.तसेच आरतीसाठी दररोज कॅम्पसमधील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच शहर व परिसरातील भाविकांची गर्दी झाली होती.

युवा नेते कुणाल दराडे, नगरसेवक रुपेश दराडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे,सुनिल पवार,प्राचार्य जी.एस.येवले,उपप्राचार्य आप्पासाहेब कदम,प्राचार्य निलेश शिंदे आदींनी नियोजन केले.यानिमित्ताने भव्य दांडिया स्पर्धेचे ही आयोजन करण्यात आले होते.

“एसएनडी शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात जगदंबा माता,संतोषी माता व रेणुका मातेचे आम्ही भव्य दिव्य मंदिर बांधले आहे.या ठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त भव्य यात्रा भरवली जाणार आहे।यावर्षी याचा प्रारंभ झाला असून रोज धार्मिक कार्यक्रम,भजन,आरती असे उपक्रम राबविले.विद्यार्थ्यांसाठी दांडिया स्पर्धाही घेतली.यापुढे अजून भव्य स्वरूपात कार्यक्रम करण्याचा मानस आहे.

किशोर दराडे,शिक्षक आमदार तथा अध्यक्ष-मातोश्री शिक्षण संस्था.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here