बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालय तळोजा येथे  “विधी शाखेतून करीयर” या विषयावर मार्गदर्शन

0

उरण दि 25(विठ्ठल ममताबादे )

 बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालय तळोजा येथे “विधी शाखेतून करीयर” या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना अनोखी दिवाळी भेट देण्यात आली.निवृत्त जिल्हा न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विधी  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी,म्हणून महाविद्यालयाचे  चेअरमन बबनदादा पाटील  तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश साखरे  तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे  म्हणून एस.वि कॉलेजचे  प्राचार्य डॉ राहुल डोंगरगांकर  उपस्थित होते.

या वेळी निवृत्त जिल्हा न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे यांनी विद्यार्थ्यां सोबत दिलखूलास चर्चा केली. त्याचबरोबर त्यांनी,मॅजीस्ट्रेट तालुका न्यायाधीश ते सर्वोच्च न्यायालयातील सर न्यायाधीश या पदापर्यंत विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कसे पोहचता येईल याबाबत आपल्या खास शैलीत उदाहरण देत  मार्गदर्शन केले. तसेच विधी क्षेत्रां आसलेल्या सर्व संधींचे त्यांनी विश्लेशण केले.

प्राचार्य डाॅ. राजेश साखरे सरांनी  या कार्यक्रमाचे प्रास्तावीक करतानाच निवृत्त जिल्हा न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे यांच्या महाडचा मुक्ती संग्राम या पुस्तकाबाबत विद्यार्थ्यांना माहीती दिली.तर या सुंदर अशा मार्गदर्शन कार्यक्रमाला  प्रोफेसर  डॉ  रामकृष्ण नायक, प्रोफेसर  डॉ राठोड सर ,प्राध्यापिका पुजा चव्हाण , प्राध्यापिका वैशाली बोराडे  ,प्राध्यापिका मा. प्राजक्ता औटी तसेच मुंबई युनिव्हर्सिटी कोओर्डिनेटर अमित सूर्यवंशी  व लायब्ररी प्रमुख शकुंतला मॅडम आधी मान्य वर व विधी महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here