गोंदवले – शासकीय अभियंत्रिकी महाविद्यालय पुणे येथे शिकत असलेली बिदाल ता.माण येथील साहेबराव अनंत भांड यांची नात व कोकण भवन येथे लेखाधिकारी असलेले संतोष साहेबराव भांड यांची कन्या कु.आयुषी संतोष भांड हिची एनसीसी (वायुसेना) मधील रायफल शूटिंग या खेळा करीता महाराष्ट्र संघात मुली मधून तिची एकटीची निवड झालेली होती. त्यानंतर अखिल भारतीय एनसीसी वायुसेना यांच्या स्पर्धा जोधपुर,राजस्थान येथे नुकत्याच पार पडल्या यामध्ये रायफल शूटिंग मध्ये कु.आयुषी संतोष भांड व इतर दोन मुले यांचा समावेश असलेल्या महाष्ट्राच्या रायफल शूटिंग संघाने भारतात प्रथम क्रमांक मिळवला.
कु. आयुषी भांड मिळविलेल्या यशामुळे तिचे बिदाल सह माण तालुक्यातुन सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.