बियाणाच्या कंपनीतून चोरलेल्या बीयाणांसह आरोपी पोलिसांनी केले २४ तासात जेरबंद !

0
पैठण : दि . २४/१०/२०२२ फारोळा अजित सीड्सच्या फारोळा येथील प्लांट मथुन अफरातफर करून चोरलेले ट्रक भरून बियाणे बिडकीन पोलीसांनी २४ तासात जप्त करून सर्व आरोपींनाअटक केली आहे. पोलीस स्टेशन बिडकीन हद्दीतील फारोळा येथील अजित सिड्स प्रा . लि.चा गट नं . १०० मध्ये प्रोसेसिंग प्लॉट असुन सदर प्लांट मधील एकुन २०४२७ पाकीटाचे ताळेबंद पाहीले असता ५१७८ पाकीटा ऐवजी ४८३१ पाकीटेच शिल्लक असून ताळेबंदापैकी एकुन ३४७ सीड्सची पाकीटे कमी असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच रेकॉर्ड चेक केले असता कंपनीच्या सुरक्षा विभागातील कर्मचारी दैनंदिन हाताळत असलेले वेहीकल ईनचे रजिस्टर , सीड्स आउट वर्ड रजिस्टर चे पाने फाडुन टाकल्याचे निदर्शनास आले .                                                                                                                                                                                                    अजीत सिड्स वाण / बियाणे पाकीटे गहु अजीत १०२, २० कि.ग्र.च्या ११, ९ व ४० कि.ग्रॅमची १४८ पाकीटे ज्याची किंमत अदांजे रुपये ५,८४,६१० / - चा अफरातफर करुन कंपनीचा विश्वासघात करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करुन कंपनीचा अफारातफर झालेला माल परत मिळावा तसेच सदर प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या लोकांवर कारवाई करावी अशी लेखी फिर्याद दिली होती . त्यावरून पोलीस स्टेशन बिडकीन येथे गुरनं ४८८ / २०२२ कलम ४०८ , ४० ९ , २०१ भादवी प्रमाणे गुम्हा नोंद करण्यात आला .पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान अजित सीड्स मधील काम करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना विचारपूस करण्यात आली तसेच घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली व कंपनीमध्ये असलेल्या सर्व रेकॉर्डची तपासणी केली . असता दिनांक १२/१०/२०२२ रोजी रात्रीला एक पांढऱ्या रंगाची आयशर कंपनीचे गाडी कंपनीमध्ये इन इ आल्याची व आऊट झाल्याची रेकॉर्डला कोणतीही नोंद केल्याचे दिसून आले नाही त्यावरून सदर वाहनाबाबत सीसीटीव्ही फुटेज व घटनेवेळी कामावर असलेले सिक्युरीटी कर्मचारी , इतर कर्मचारी व हमाल यांना विचारपूस केली असता सदर वाहनांचा क्रमांक एम एच ०४ जी आर ७८८३ असल्याचे निष्पण झाले . त्यावरून सदरचे वाहनात बियाणे भरणारे हमाल तसेच कर्मचारी यांना विचारपूस केली असता त्यांनी कंपनीतील सुपरवायझर दत्ता लक्ष्मण घोरपडे रा . पिंप्रीराजा ता . जि . औरंगाबाद याने गाडी भरायला सांगीतल्याचे सांगीतले . त्यावरून दत्ता घोरपडे यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने सदरचा माल त्याचे गावातील मित्र अख्तर गफ्फार शेख रा . पिंप्रीराजा याचे मदतीने आयसर मॉडल ३०१३ वाहन क्रमांक एम एच ०४ जी आर ७८८३ चे चालक अझहर खमरोद्दीन काझी व आदील फईम काझी दोन्ही रा . पिंप्रीराजा यांचेशी संगणमत करून स्वतःचे फायद्याकरीता सदरचे वाहन कंपनीमध्ये बोलावून कंपनीतील कर्मचारी व हमाल यांचेकडून वाहनात अजीत सिड्स वाण / बियाणे पाकीटे गहु अजीत १०२- २० कि.ग्र.च्या ११ ९ व ४० कि.ग्र.च्या १४८ पाकीटे ज्याची किंमत अदांजे रुपये ५,८४,६१० / - रू.चा माल भरून घेवून दत्ता घोरपडे याने गेट पास , बिल्टी ( डी.सी ) व इतर कागदपत्र तयार करून गेटवरील सेट्रींला गेट पासून देवून सदरची मालासहीत गाडी चालक अझहर खमरोद्दीन काझी , अख्तर गफ्फार शेख व आदील फईम काझी यांनी घेवून पिंप्रीराजा येथे नेवून माल तेथेच ठेवला . त्यावरून सदर गुन्हयात आरोपी नामे १ ) दत्ता लक्ष्मण घोरपडे वय ३७ वर्ष रा . पिंप्री राजा ता . जि . औरंगाबाद . २ ) अख्तर गफ्फार शेख वय ३४ वर्ष रा.पिंप्रीराजा ता . जि . औरंगाबाद . ३ ) आदिल फईम काजी वय १ ९ वर्ष रा . पिंप्रीराजा ता . जि . औरंगाबाद , ४ ) अजहर कमरोद्दीन काजी वय ३५ वर्ष रा . मु . रांजणी ता . घनसावंगी जि.जालना यांना गुन्हयात अटक करण्यात आली . त्याचेकडून गुन्हयातील गेला सर्व मुद्देमाल ज्याची किंमत अदांजे रुपये ५,८४,६१० / - रू.चा माल व गुन्हयात वापरलेले आयसर मॉडल ३०१३ वाहन क्रमांक MH ०४ GR ७८८३ किं.अं. १०,००,००० / - असा एकुण १५,८४,६१० / रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक औरंगाबाद ग्रामीण मनीष कलवानिया यांचे मार्गदर्शनाखाली . उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल , सपोनि संतोष माने. , पोउपनि महेश घुगे , पोनॉ / शरद पवार ब.नं. ११५० यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि महेश घुगे हे करीत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here