बिल्किस बानो प्रकरणात 11 दोषींना सोडण्याला केंद्रानेच दिली परवानगी

0

नवी दिल्ली : बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची सुटका करण्यात आली. गुजरात सरकारच्या माफी धोरणानुसार ही सुटका करण्यात आली.
या सुटकेच्या निर्णयावर अमित शाह मंत्री असलेल्या गृहमंत्रालयाची परवानगी असल्याचंकेल्याचं न्यायालयीन कागदपत्रांतून स्पष्ट झालं आहे.याबाबतचे बी बी सी मराठीने दिले आहे.
याआधी यासुटकेला सरकारच्या समितीने या गुन्हेगारांच्या सुटकेचा निर्णय घेतला होता. परंतु काल 17 ऑक्टोबर रोजी एक नवी माहिती उघड झाली आहे. गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये या निर्णयाला केंद्रीय गृह खात्याची परवानगी होती असं म्हटलं आहे. या दोषींची सुटका आणि त्यांचं स्वागत याबद्दल गुजरातमधील एका भाजप आमदारांनी केलेल्या एका वक्तव्यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती.

दरम्यान, या दोषींच्या सुटकेनंतर भाजपचे ग्रोधाचे आमदार सीके राऊलजी यांनी मोजो स्टोरीशी बोलताना हे लोक ब्राह्मण आहेत, चांगल्या संस्कारातील आहेत असं विधान केलं आहे.


‘गुजरात सरकारच्या निर्णयामुळे आमची भीती वाढली’ बिल्किस बानोच्या नवऱ्याची प्रतिक्रिया
ब्राह्मणांवरील संस्कारांबद्दल आपल्याला माहीत आहे. त्यांना शिक्षा व्हावी असा काही जणांचा दुर्हेतू असू शकतो, असं या आमदारांनी या मुलाखतीत म्हटलं आहे.

या दोषींचं तुरुंगातलं वर्तन होतं अशी पुस्तीही त्यांनी जोडली. सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्यांची क्लिप व्हायरल होत आहे.

सीके राउलजी हे गुजरात सरकारने या प्रकरणी गठित केलेल्या समितीचे सदस्य होते. या समितीने काही महिन्यांपूर्वीच या प्रकरणी सर्व 11 दोषींची सुटका करण्याचा निर्णय एकमताने घेतला होता. समितीने राज्य सरकारला याप्रकरणी शिफारसही केली होती. त्यानंतरच सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची सुटका शक्य झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here