बीडजवळ भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या गाडीला अपघात !

0

बीड : बीड-केज रोडवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या कारवर रिक्षा पलटी झाली. सुदैवाने या अपघातात माधव भंडारी आणि त्यांच्या सोबत असलेले राम कुलकर्णी यांना कसलीही इजा झाली नाही. शनिवारी (दि. १५) माधव भंडारी आणि दुसरे सहकारी राम कुलकर्णी हे एका कार्यक्रमानिमित्त बीड-केज रोडने आंबेजोगाईकडे जात असताना ही घटना घडली.

मस्साजोग येथे वाळूचा ढिगारा चुकविण्याच्या प्रयत्नात असलेली रिक्षा माधव भंडारी यांच्या कारवर पलटी झाली. या अपघातात माधव भंडारी यांच्या कारचे किरकोळ नुकसान झाले आहे. यात सुदैवाने माधव भंडारी आणि राम कुलकर्णी हे सुखरूप असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. तसेच रिक्षातील प्रवासी सुखरूप असून रिक्षाचालक किरकोळ जखमी झाला आहे. त्याच्यावर नेकनुर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, संतोष गिते, बाळासाहेब अहंकारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here