बेशिस्त आणि नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांना जामखेड पोलिसांचा दणका ; केला २२ लाख ७२ हजार रुपयांचा दंड वसूल !

0

जामखेड ता. प्रतिनिधी  

    जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड शहरातील वाहतूक विभागाचे इनचार्ज पोलीस काॅन्स्टेबल आजीनाथ जाधव यांनी शहरातील वाहतूक नियंत्रण करताना नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांवर विविध प्रकारच्या कारवाया करत तब्बल जानेवारी २०२२ ते आॅक्टोबर २०२२ अखेर २२ लाख ७२ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.

     यामध्ये वाहतुकीस अडथळा करणारी वाहने न्यायालय केसेस २८ दंड ५६००, अवैद्य प्रवाशी वाहतूक ५ केसेस १३,३०० रुपये दंड, दारू पिऊन वाहन चालवणे ९ केसेस १६,९०० दंड, ऑनलाईन ३९२३  केसेस २२,७२,७०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहन धारकांना शिस्त लावण्याबरोरच दंडाची मोठी रक्कम वसूल करून शासनाला मोठा महसूल  मिळवून देण्याचे कामही जामखेड पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेकडून केले जात आहे. 

पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉ. दिनेश गंगे, होमगार्ड रफिक तांबोळी यांचेही याकामी मोलाचे सहकार्य असते अशी माहिती वाहतूक शाखेचे इनचार्ज अजीनाथ जाधव यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here