भगवान रामासारखी इच्छाशक्ती देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

लखनऊ : स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवात भगवान रामसारखी इच्छाशक्ती देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल, जी मूल्ये प्रभू रामाने आपल्या शब्दात, विचारात, आपल्या शासनात, प्रशासनात रुजवली. ते सबका साथ-सबका विकासाचे प्रेरणास्थान आणि ‘सबका विश्वास-सबका प्रयास’चा आधार आहेत. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील जनसमुदायाला संबोधित केले.
पंतप्रधान मोदी हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते रामाचं दर्शन घेऊन दीपोउत्सवात सहभागी झाले. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत शरयू घाटावर १५ लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले. पंतप्रधान पुढे म्हणाले की स्वातंत्र्याच्या अमृततुल्य काळात देशाने आपल्या परंपरेचा अभिमान बाळगून गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडायला हवे. भगवान राम कोणाचीही साथ सोडत नाहीत, असं ते म्हणाले आहेत.असं म्हणाले आहेत. ते म्हणाले की, “श्री रामललाचे दर्शन आणि त्यानंतर राजा रामाचा अभिषेक, हे सौभाग्य रामजींच्या कृपेनेच प्राप्त झाले आहे. जेव्हा श्रीरामाचा अभिषेक होतो तेव्हा प्रभू रामाचे आदर्श आणि संस्कारआपल्यात दृढ होतात.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here