भटक्या विमुक्तांनी भटकंती थांबवुन पाल्यांच्या शिक्षणासाठी स्थिरता निर्माण करावी.

0

पालावर दिवाळी फराळ वाटप

सातारा : समाजातील भटके – विमुक्त समाज बांधवांनी आता भटकंती थांबवून पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करण्याची नितांत गरज आहे. असे आवाहन उपाध्यक्ष आर.एस. इंजे यांनी केले. 

         येथील संबोधी प्रतिष्ठानतर्फे देगाव फाट्यावरील भटके कुडमुडे जोशी समाज,अहिरे – जाधव काॅलनीमधील – भटक्यांच्या पालावर जाऊन दिवाळीच्या निमित्ताने मिठाईचे वितरण करण्यात आले.तेव्हा इंजे बोलत होते. अध्यक्षस्थस्थानावरून बोलताना अध्यक्ष दिनकर झिंब्रे म्हणाले, “भटकंतीमुळे भटक्या विमुक्त समाजाचे मागासलेपण टिकून तर राहिलेच आहे. त्याबरोबरच समाज अधिकाधिक गरीबीत व दारिद्रयात रूतला आहे. यातून बाहेर येण्याचा मार्ग म्हणजे शिक्षणाची कास धरणे हाच पर्याय आहे.” सहकार्यवाह अनिल बनसोडे यांनी उपस्थीत लहान मुलांना दीपावलीच्या निमित्ताने मौलिक व विचार प्रवर्तक पुस्तके खरेदीसाठी आर्थिक मदत देवू केली. तसेच शैक्षणिक अडचणीस्तव आम्ही सदैव आपल्यासोबत आहोत. फक्त हाक द्या. मदतीसाठी आम्ही तयार आहोत.असाही त्यांनी दिलासा दिला. याकामी,माजी अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे व कुटुंबीय यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी  सौ. रतन गजेंद्र गंगावणे, सौ. रेखा युवराज वाईकर, सौ. बबली हणमंत गोंडे, सौ. उषा राम गदाई, श्रीमती सराबाई हिरामण साळुंखे, गंगावणे, वाईकर, गोंडे, गदाई, साळुंखे आदी परिवारातील कुटुंबप्रमुख व सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते मिठाई – फराळाचे वाटप करण्यात आले.कार्यवाह ऍड.हौसेराव धुमाळ यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.

  सदरच्या कार्यक्रमास कोषाध्यक्ष केशवराव कदम,पदाधिकारी, विश्वस्थ यांच्यासह राष्ट्रोत्सव संयोजन समितीचे उपाध्यक्ष प्रा.विलासराव वहागावकर, प्रा.पोतेकर,बंधुत्व प्रतिष्ठाचे संस्थापक अनिल वीर आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो  : पालातील लाभार्थी यांना दिवाळी फराळ वाटप करताना दिनकर झिंब्रे शेजारी मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here