भव्य मोफत मुळव्याध उपचार शिबिराला उत्तम प्रतिसाद .

0

मुळव्याध हे अवघड जागेवरचं दुखणं – सचिन पोटरे

जामखेड तालुका प्रतिनिधी :

लोकनेते आबासाहेब निंबाळकर ग्रामीण विकास प्रतिष्ठान व जिवन साई हाॅस्पिटच्या संयुक्त विद्यमाने जामखेड शहरात मोफत मुळव्याध उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना महामारी , दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती , महागाईने त्रस्त जनतेला मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन अहमदनगर भाजपा चे सरचिटणीस  सचिन पोटरे यांच्या हस्ते करण्यात आले . मुळ्याध हे अवघड जागेवरचं दुखणं असून त्याचा इलाज हा खर्चीक असून तो सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नाही म्हणून हा उपक्रम कौतुकास्पद आहे असे उद्गार पोटरे यांनी काढले , जगप्रसिद्ध मुळव्याध तज्ञ डॉ प्रदीप तुपेरे व जीवन साई हाॅस्पिटच्या सर्व स्टाफ चे कौतुक केले.या वेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत उपस्थित होते . जामखेड तालुक्याचे सुपुत्र डॉ प्रदीप तुपेरे ( एम एस सर्जन ) यांनी सामाजिक बांधिलकी जपतं आता पर्यंत दोन लाख गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत .  प्रत्येक रविवारची सुट्टी आनंदात न घालता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोफत मुळव्याध उपचार शिबिराचे आयोजन करून जनसेवा करतं आहेत . कर्जत , जामखेड , आष्टी , पाटोदा  , परांडा या तालुक्यातून रुग्ण उपचारासाठी आले होते . या शिबिराचा तीनशेहून जास्त रुग्णांना मोफत लाभ मिळाला आहे . भुल तज्ञ डॉ नितीन समुद्र हे देखील प्रत्येक शिबीरातं मोफत सेवा देत आहेत. या शिबीराला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे , राष्ट्रवादीचे नेते मधुकर राळेभात , पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर,  सुर्यकांत मोरे , काँग्रेस अध्यक्ष सुनील शिंदे, कर्जतचे भाजप शहर अध्यक्ष गणेश क्षीरसागर, , भाजपाचे मनोज कुलकर्णी , माजी सरपंच कैलास माने, अशोक महारनवर, प्रा.विकी घायतडक, उद्धव हुलगुंडे, महेश मासाल यांनी भेट दिली . शिबीर यशस्वी होण्यासाठी लोकनेते आबासाहेब निंबाळकर ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण बोलभट व सचिव विष्णू गंभीरे व अशिष मासाळ यांनी परिश्रम घेतले . शिबिरासाठी जीवन साई हाॅस्पिटलचे संचालक डॉ भरत देवकर व डॉ पठाण यांनी  मोफत हाॅस्पिटलं उपलब्ध करून दिले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here