भाग्योदय उच्च माध्यमिक विद्यालयाचा इ.12 वीचा 98.22 निकाल

0

नगर – मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या पुणे बोर्डाच्या इ.12 वी (एच.एस.सी.) परिक्षेत केडगांव येथील भाग्योदय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कला शाखेचा  निकाल 98.22 टक्के लागला. या परिक्षेस 56 विद्यार्थी बसले होते. त्यातील 55 विद्यार्थी पास झाले. यामध्ये विशेष प्राविण्यसह 5, प्रथम श्रेणित 29 व द्वितीय श्रेणीत 21 विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले.

     यामध्ये कु.साबा शफिक शेख (82.17%) प्रथम, कु.श्रद्धा किशोर पाचारणे (78.50%) द्वितीय तर कु.साक्षी गवराम नवले (77.33%) गुण मिळवत विद्यालयात अनुक्रमे आले.

     सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक भानुदास कोतकर, सचिव रघुनाथ लोंढे, संचालिका वैशालीताई कोतकर, प्राचार्य ज्ञानदेव बेरड व सर्व शिक्षवृंदांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here