भाजपाच्या माध्यमातून जिल्हयात राजकिय दुर्गंधी पसरतेय – रामराजे निंबाळकर 

0

खंडाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा     

खंडाळा : सातारा जिल्ह्यावर नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे . सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देता आला . परंतु आता भाजपाच्या संस्कृतीलाही काळीमा फासणारे काही लोक जिल्हयात सक्रीय झाले आहेत . या विचित्र लोकांच्या विचारांची राजकीय दुर्गंधी जिल्हयात पसरत चालली आहे . त्यांच्या हातात जिल्हा जाऊ देवू नका . राष्ट्रवादीला बळकटी देण्यासाठी साथ दया असे आवाहन विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले .
           खंडाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपर्क अभियान मेळावा बावडा येथे आयोजित केला होता . यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर , माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील , आमदार शशिकांत शिंदे , आमदार मकरंद पाटील , आय.टी. सेलचे अध्यक्ष सारंग पाटील , जि .प. अध्यक्ष उदय कबुले , बकाजीराव पाटील , बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ , बाळासाहेब सोळसकर , नितीन भरगुडे पाटील , शामराव गाढवे , मनोज पवार , दिपाली साळुंखे ,  राजेंद्र तांबे , अजय भोसले , रमेश धायगुडे ,  सुचेता हाडंबर , गजेंद्र मुसळे, राजेंद्र भोसले , नंदा गायकवाड , मधुमती गालिंदे यांसह प्रमुख उपस्थित होते .
    बाळासाहेब पाटील म्हणाले , लोकहिताची कामे करण्यात राष्ट्रवादी अग्रेसर आहे . राज्यात नको त्या घडामोडी करणारांना गद्दार म्हणल्याचा राग येतोय .  भाजप त्यांची धोरणं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून राबवत आहे . सध्या राज्यात जनतेची दिशाभूल केली जातेय . राज्याला वाचविण्यासाठी राष्ट्रवादीचा विचार तळागाळात पोहचवा .
शशिकांत शिंदे म्हणाले , राज्यात रात्रीत एखादय पक्षाचं चिन्ह गोठवलं जातं , पक्षाचं नाव पण जातं हे हुकमशाहीचं लक्षण आहे . सरकार मस्तीत वागत आहे . राज्यात लोकशाही टिकवायची लागेल तर  हुकुमशाही उखडून टाका अन्यथा इतर पक्षांचं भवितव्यही धोक्यात येऊ शकते . महाविकास आघाडी सरकार पाडण्याचं षडयंत्र केंद्र सरकारचे होते . चाललयं ते चुकीचं आहे ही प्रत्येकाची खंत आहे . देशाच्या राजकारणातील लोकशाही धोक्यात आहे . फोडाफोडी करुन जिल्हयाची सत्ता घेण्याची स्वप्नं पाहणारांना बाजूला सारा असे आवाहन त्यांनी केले .
     ॥ आबा एक विचार ….  काही वर्षांपूर्वी जे नव्हतं ते बघितलेली पिढी राजकारणात आली आहे . त्यांना विचारधारा द्यावी लागेल . मकरंद पाटील यांच्या रूपानं जनमाणसांची नाळ आणि विकासाचं वेड असलेल आमदार तुम्हाला मिळालेत त्यांच्या पाठीशी खंबीर रहा . खंडाळा तालुका चळवळीतून उभा राहिला आहे . या तालुक्याने राजकारणात जात कधी पाहीली नाही ही परंपरा आहे .जात हा विचार होऊ शकत नाही असेही मत रामराजे यांनी व्यक्त केले .॥

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here