भाजपा युवा मोर्चा तर्फे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न!

0

सेवासप्ताह अंतर्गत ७२ व्या वाढदिवसानिमीत्त ७२ व्यक्तींनी केले रक्तदान.*

*बुलडाणा दि.१७, सप्टेंबर.* देशाचे कर्तृत्ववान व विकासाभिमुख नेतृत्व आदरणीय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमीत्त संपुर्ण देशभरात सेवासप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असुन बुलडाणा शहरात भाजपा जनता युवा मोर्चाच्यावतीने भाजपा तालुका सरचिटणीस डॉ.राजेश्वर उबरहंडे यांच्या श्रीकृपा हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सदर रक्तदान शिबीराचे उद्घाटन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील व माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

<p>यावेळी बुलडाणा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी रक्तदान शिबीराला भेट देऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या. सदर शिबीरात आदरणीय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमीत्त ७२ व्यक्तींनी रक्तदान केले. तर ३२० व्यक्तींनी अवयवदानाचे अर्ज आयोजकांकडे सुपूर्द करुन सामाजिक बांधिलकी जोपासण्यात योगदान दिले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.सुनिल देशमुख, भाजपा तालुका सरचिटणीस डॉ.राजेश्वर उबरहंडे व ॲड.दशरथसिंग राजपूत, युवा मोर्चा जिल्हा संपर्कप्रमुख पद्मनाभ बाहेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मंदार बाहेकर, भाजपा शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सौ.विजयाताई राठी व दत्ता पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप उगले, युवा मोर्चा शहराध्यक्ष सोहम झाल्टे, युवा मोर्चा जिल्हा सचिव दत्ता शेवाळे व सिध्दु लडके, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सतिश पाटील, प्रदीप मांडवगडे, यश तायडे व अमोल पडोळ, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष जयेश पडोळ, प्रवीण गाडेकर, व संतोष पालकर, युवा नेते ॲड.पराग वाघ, पंजाबराव इलग, भाजपा सोशल मीडिया तालुका संयोजक गणेश पांडे, भाजपा तालुका सचिव गजानन देशमुख, विजय हिवाळकर, राजु पाठक, गणेश देहाडराय, सिद्धेश्वर पडोळ, अरविंद होंडे, सौ.स्मिता चेकेटकर, युवा मोर्चा सोशल मीडिया तालुका संयोजक अभिषेक वायकोस, दत्तात्रय जेऊघाले, उदय देशपांडे, ज्ञानेश्वर देशमुख, परमेश्वर उबरहंडे, निलेश चौथे, कैलास खेडेकर, श्रीकुमार पाठक, नितीन बेंडवाल, किरण नाईक, वैभव राजपूत, मोहित भंडारी, ज्ञानेश्वर देशमुख, पंढरी सुरुशे, गोपाल राजपूत, शंकर मोहिते, निलेश चौथे, गौरव लोखंडे, बंडू चिंचोले, दिलीप काळे, लक्ष्मण डिघे, उमेश गाडेकर, योगेश पडोळ, राजु नाटेकर, अनिल उबरहंडे, शुभम डव्हळे, आकाश वाघ, दिलीप ताठे, आदी मान्यवरांसह, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here