करंजे(ता. बारामती) : जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका यांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी करंजेपूल पोलिस दुरक्षेत्रचे पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे साहेब, रमेश नागटिळक उपस्थित होते याच बरोबर बारामती दुध संघाचे व्हा.चेअरमन संतोष शिंदे हे हि उपस्थित होते.
या ठिकाणी जागतिक अपंग दिनानिमित्त संघाचे पुणे जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे यांचा शाल व श्रीफळ देऊन विषेश सन्मान करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती करंजे येथील सरपंच भाऊसो हुंबरे, उपसरपंच सचिन पवार ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटोळे, मयुरी गायकवाड अफसाना मुलाणी खुर्शिदा मुलाणी,तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड उपस्थित होते तसेच, करंजेपूल सोमेश्वरनगर च्या सरपंच पुजाताई गायकवाड, उपसरपंच शेखर गायकवाड.चौधरवाडीचे सरपंच शशिकांत पवार, मगरवाडीच्या सरपंच विनिता हगवणे. मुर्टी गावच्या सरपंच कोमलताई जगताप, उपसरपंच किरण जगदाळे. सायंबाचीवाडी सरपंच जालिंदर भापकर, उपसरपंच हनुमंत बांदल. वाकीचे सरपंच किसनराव बोडरे,उपसरपंच इंद्रजित जगताप हे उपस्थित होते.सत्कारानंतर सर्व सरपंचांच्या वतीने शशिकांत पवार सरपंच चौधरीवाडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी भारतीय पत्रकार संघाचे लीगल विंगचे प्रदेशाध्यक्ष अॅड.समीर बेलदरे पाटिल,अॅड कैलासजी पठारे,अॅड पांडुरंग ढोरे पाटील, विभागीय अध्यक्ष सिकंदरजी नदाफ, पुणे जिल्हा अध्यक्ष तैनुरभाई शेख. पुणे जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे यांच्यासह भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका अध्यक्ष,विनोद गोलांडे उपाध्यक्ष,शंतनु साळवे सचिव,सुशिलकुमार अडागळे संघटक,महंमद शेख. हल्ला कृती समिती प्रमुख,निखिल नाटकर. कोषाध्यक्ष,सोमनाथ जाधव. संघ प्रेस फोटोग्राफर,जितेंद्र काकडे. सोशल मीडिया प्रमुख,मधुकर बनसोडे. सदस्य पत्रकार संतोष भोसले,रमेश कदम,सुभाष जेधे,फिरोज भालदार,ऋषिकेश जगताप,अजय पिसाळ शौकतभाई शेख, संजय कुंभार,शरद भगत उपस्थित होते.