सातारा/अनिल वीर : भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी (प.) भागवत भोसले व बाळासाहेब जाधव (पू.) यांच्या नुकत्याच निवडी महाविहार येथे झालेल्या सहविचार सभेत जाहीर करण्यात आलेल्या आहेत.इतर पुढीलप्रमाणे आहेत.
पश्चिम जिल्हा कोषाध्यक्ष विद्याधर गायकवाड व जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष नंदकुमार काळे आदींच्याही निवडी जाहीर करण्यात आलेल्या आहेत.या सर्वांचा नुकताच सातारा तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या उत्साही टीमने येथील सांस्कृतिक भवनमध्ये सत्कार करण्यात आला आहे.
जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे नूतन कार्यकारिणी पुनर्रचना करण्यासंदर्भात महाविहार येथे महत्वपूर्ण सभेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भिकाजी कांबळे,केंद्रीय निरीक्षण कमीटी एस. के. भंडारे ( राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रभारी), ऍड.एस. एस. वानखेडे (राष्ट्रीय सचिव),रुपेश तामगावकर (सदस्य,केंद्रीय ऑडीट कमिटी), माजी जिल्हाध्यक्ष व्ही. आर. थोरवडे,भारतीय बौद्ध महासभेचे माजी पदाधिकारी, जिल्हा, तालुका, शहर, ग्रामशाखा तसेच केंद्रीय शिक्षक-शिक्षिका बौद्धाचार्य, माजी श्रामणेर, आजी-माजी पदाधिकारी, समता सैनिक दल यांच्यासह महासभेशी संलग्न असणारे विविध सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.