भारतीय सविधानाच्या माध्यमातून बुध्द धम्माच्या नीतीमुल्यांचा प्रसार

0


विश्वभूषन बोध्दिसत्व डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे जागतीक दर्जाचे, सामाजीक, राजकीय, आर्थीक, शैक्षणिक तज्ञ म्हणून बघितल्या जाते. भारतासारख्या खंडप्राय देशाला त्यांनी अव्दितीय राज्यघटना दिली. युगायुगापासून या देशावर अस्पृश्यतेचा कलंक होता तो पुसून टाकला. या देशाचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण करत असतांना शोषीत पीडीत वंचित समाज त्याचा केंद्र बिंदू होता महामानव तथागत भगवान बुध्दांना अभिप्रेत असलेला प्रज्ञा शिल करूणा व समतेवर आधारित असलेला, बहुजन हिताय बहुजन सुखाय चे आदर्श कल्याणकारी राज्य त्यांना अभिप्रेत होते. भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून बुध्द धम्माचे महान नितीमुल्य प्रतिबींबीत झालेली आपणाला दिसत आहे.
डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य अखिल मानव जातीसमोर दीपस्तंभ प्रमाणे आहे. महान धम्म उपासक व प्रचारक चक्रवर्ती आशोका नंतर धम्म चळवळ गतीमान करण्याचे काम बोध्दिसत्व परपुज्य डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत भगवान बुध्दांनी मानवजातीच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या बुध्द धम्म भारत देशामध्ये नाममात्र राहीला होता. चिन, जपान, श्रीलंका, थायलंड व इतर राष्ट्र बौध्द धर्मीय राष्ट्र म्हणून उदयास आली व त्यांनी सर्वांगीन प्रगती केली.


बौध्द धम्माच्या सुकलेल्या वेलीला पाणी घालून बहरण्याचे काम डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. चौथीच्या परिक्षा पास झाल्यानंतर सत्कार समारंभामध्ये आदर्णीय केळूसकर गुरूजीनी डॅा. बाबासाहेब आंबेडकरांना बुध्द चरित्र हे पुस्तक भेट दिले होते. त्याचा दूरगामी परिणाम त्यांच्या भावी जीवनावर झाला. समतेवर बौध्द धम्मच या देशाला विषमतेवर पर्याय होवू शकतो. त्यामुळे १९३५ मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवले ठीकाणी घोषणा केली की, मी ज्या धर्मामध्ये जन्मलो त्या धर्मामध्ये मरणार नाही. सर्वधर्माचा तौलीक अभ्यास करूण त्यांनी १४ आक्टोंबर १९५६ अशोका विजयादशमीच्या दिनी आपल्या पाच लाख अनुयायांना बुध्द धम्माची दिक्षा नागपूरला दिली. नागपूर या ठीकाणी पार पडलेल्या धम्म दिक्षा सोहळ्यासारखे कार्यक्रम त्यांना घ्यावयाचे होते. आणि संपूर्ण भारत बौध्दमय करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही कारण ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महापरिवाण झाले त्यांचे स्वप्न अधूरे राहीले पाहीले. डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे.
या देशामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थीक, धार्मीक, सांस्कृतीक क्षेत्रमध्ये काम करणाऱ्या आंबेडकरी अनुयायी व बौध्द धम्म अनुयायी यांची संख्या मोठी आहे. उगवनारा प्रत्येक दिवस यामध्ये कासव गतीने भर टाकत आहे. डॅा. बाबासाहेब आंबेडकर आपले प्रेरणास्थान आहे. त्यांचे आचार, विचार, संस्कार त्यांच्या मधली असलेली प्रज्ञा, शिल, करूणा मैत्रीच मुर्तीमंत प्रतिक आंबेडकरी अनुयायामध्ये बौध्द धम्म दिसला पाहीजे.
डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी अयुषाच्या सायंकाळी अखेरच्या क्षणामध्ये भगवान बुध्द आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहीला. ज्या प्रमाणे इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराण, ख्रिचन धर्माचा पवित्र ग्रंथ बीयबल त्याच प्रमाणे बुध्द धम्माचा “ भगवान बुध्द आणि त्याचा धम्म “ हा ग्रंथ पवित्र आहे. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॅा.बाबासाहेब आंबेडकर लिहीतात, बौध्द धम्माची प्रगती अत्यंत हळू झाली त्याचे कारण इतके आहे ते कुणी वाचू शकणार नाही आणि ख्रिचनांप्रमाणे त्यांचे स्वत:चा असा बायबल सदृश्य ग्रंथ नाही. त्यामुळे मी हा ग्रंथ लीहीला आहे. सोप्या आणि सहज भाषेत ग्रंथ लिहील्यामुळे सर्व सामान्य लोक हा ग्रंथ वाचतील समजून घेतील व त्याचा प्रचार प्रसार करतील. डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी चरित्राला अनन्य साधारण महत्व दिले. शिलाशिवाय तूमचा विव्दत्ता कुचकामी आहे म्हणुन शिल जपले पाहीजे. सर्व प्रकारच्या विकारापासून व्यसनापासून कोसो दूर असलेले व खऱ्या अर्थाने बुध्दमार्गाचा मार्गक्रम करणारे सर्वोत्तम आदर्श बौध्द धम्म उपासक आहेत. त्यांचे अनुयायी म्हणून प्रत्येक बौध्द उपासक उपासीका यांनी डॅा.बाबासाहेब आंबेडकरांचा दिलेला बुध्द धर्मावरील संदेश आचरणात आणून तो आत्मसात करावा हे अभिप्रेत असलेला आदर्श बौध्द धम्म उपासक उपासीकांनी हा समाज निर्माण व्हावा व त्यांनी दिलेला पवित्र बौध्द धम्माचा प्रचार व प्रसार करणे ही आपली बौध्द उपासक उपासिकेची नैतिक जबाबदारी आहे. हे “ भगवान बुध्द आणि त्याचा धम्म “ या ग्रंथामध्ये डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला प्रतिज्ञा दिली आहे. प्रत्येक आंबेडकरी आनुयानी व बौध्द आनुयानी या बौध्द धम्माचे महान विचार आचरणात आणून डॅा. बाबासाहेब आंबेडकरा सारखे सर्वोत्तम आदर्श बौध्द धम्म प्रचारक उपासक, उपासिका व्हावे हीच. आपेक्षा.
बाबासाहेब जाधव – बुलडाणा
मो. ९४२२५९१३२१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here