भोकरदन कृषी विभागाच्या विविध योजनेत मोठा भ्रष्ट्राचार

0

केदारखेडा/ जालना प्रतिनिधी : भोकरदन तालुक्यातील काही गावात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना हाताशी धरून योजना न राबवता परस्पर पैसे काढण्यात आल्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी भोकरदन यांच्याकडे करण्यात आली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की कृषी विभागाअंतर्गत सन 2014-15ते 2022-23 या वर्षा पर्यंत कृषी विभागाच्या पोकर,महाडीबीटी ,म.ग्रा.रो.ह.mts योजने अंतर्गत शेततळे,mdh/mkvy योजने अंतर्गत शेततळे योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून कृषी विभागाच्या योजनेमध्ये खुप मोठा भ्रष्टाचार झाला असून  संबंधित कामाची मोका तपासणी करण्यात यावी तपासणी करण्यात यावी अशी मागणी तक्रादाराने निवेदनात केली आहे .  

सन 2014-15ते 2022-23 या वर्षात खामखेडा, पळसखेडा पिंपळे,पळसखेडा ठोबरे, गव्हाण संगमेश्वर, थिगळखेडा,बानेगाव,बारव पिंपळगाव या गावात ना.दे.सं. प्र. पोखरा योजने अंतर्गत शेडनेट,ठिबक,पाईप,वैक्तिक शेततळे,सामूहिक शेततळे, पॉलिहाऊस,विहीर, तसेच महाडीबीटी योजने अंतर्गत यांत्रिकीकरण ,फळबाग ,शेततळे,  कांदाचाळ,व म.ग्रा.रो.ह.योजने अंतर्गत फळबाग,शेततळे,तसेच mts  योजने अंतर्गत शेततळे व mdh /mkvy योजने अंतर्गत शेततळे वरील कृषी विभागाच्या  योजनांच्या कामात  मोठ्या प्रमणात भ्रष्टाचार झाला आहे . काही शेततळ्याचे आकारमान खूपच कमी आहे . काहींनी तर शेडनेट न उभारता पैसे काढून घेतले आहे. तर काहीं शेतकऱ्यांनी शेततळे न करता पैसे उचलून घेतले.व रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड न करता पैसे उचलून घेतले आहे. कांही शेतकऱ्यांनी mts व mdh /,योजने अंतर्गत बोगस शेततळी केले आहे .व महाडीबीटी योजने अंतर्गत कांदाचाळ न करता अधिकाऱ्यांना हाताशी धरून परस्पर पैसे उचलून घेतले आहे .
तरी तालुका कृषी अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन वरील गावाची विशेष समिती नेमून तक्रारदारा समक्ष मोका तपासणी करण्यात यावी.आणि यात
जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here