“मंचरचे मो. शकील जाफरी यांना ‘विशिष्ट भारतीय’ बिरुदावली आणि पुरस्कार जाहीर

0

        पुणे : मंचर, पुणे येथील बहुभाषिक कवी आणि सामाजिक कार्यकर्ता मोहम्मदशकील जाफरी यांना तेलंगाणा येथील श्रीक्षेत्र वनदुर्गा क्षेत्र, मेदक जिल्ह्या, तेलंगाना येथील “मल्लिनाथ सूरी कलापीठम् संस्थान, येडू पायल” या संस्थे तर्फे ‘विशिष्ट भारतीय’ “बिरुदावली” आणि पुरस्कार जाहीर कण्यात आले आहे. 

              मो. शकील जाफरी हे “मल्लिनाथ सूरी कलापीठम् संस्थान, येडू पायल” तर्फे घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रक्रिया आणि विषयांवर तेलगू भाषेत सातत्याने दर्जेदार काव्यात्मक रचना लिहण्याचा कार्य केले होते. मो. शकील जाफरी यांनी केलेल्या या तेलगू साहित्य सेवेबद्दल सदर बिरुदावली आणि पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आले. 

              सामाजिक कार्यकर्ता, जादूगार, बहुभाषिक कवी, मुक्त पत्रकार, व्याख्याता, लेखक आणि नाणे, नोटा व टपाल तिकिटांचे संग्राहक म्हणून सर्वांना सुपरिचित असलेल्या मो. शकील जाफरी हे 1988 पासून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक साहित्यिक आणि सांस्कृतीक क्षेत्रात कार्यरत, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण जागरूकता, व्यसनमुक्ती, साक्षरता अभियान, धर्म निरपेक्षता आणि राष्ट्रीयएकात्मता आदी विविध विषयांवर महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यात कार्य करीत आहेत                                                    

               मो. शकील जाफरी हे मराठी, उर्दू, हिंदी आणि तेलगू भाषेत साहित्य निर्मिती करतात आणि यांची मराठी कविता मुंबई विद्यापीठात fyba च्या अभ्यासक्रमातही आहे. ‘हे प्रेषिता’ मराठी कवितासंग्रह आणि ‘इस्लाम समज – गैर समज’ वैचारिक लेखसंग्रह प्राकाशित आहेत. तसेच तेलगू भाषेत ‘कवन सकिनालू’ , ‘दृश्यमोक भाग्यमे’, ‘तात्विक सत्यालू’ हे तीन कविता संग्रह तसेच ‘गज़ल रुबाईला रंगेळी’ हा गज़ल रुबाईंचा संग्रह आणि ‘कथला मधुरिमा’ हा कथा संग्रह प्रकाशित आहेत.  

               कलापीठाचे राष्ट्रीय अध्यक्ष दृश्यकवी श्री अमरकुला दृश्यकवी चक्रवर्ती यांनी मो. शकील जाफरी यांना सदर पुरस्कार घोषित केलं असून येत्या नोव्हेबरमध्ये तेलंगाना येथे होणाऱ्या एका राष्ट्रीय कार्यक्रमात हा विशेष पुरस्कार आणि ‘विशिष्ट भारतीय’ “बिरुदावली” मो. शकील जाफरी यांना मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार असल्याचे कळविले आहे.

               यापूर्वीही मो. शकील जाफरी यांना अनेक पुरस्कार आणि बिरूद मिळाले आहेत. तेलगू सहीत्य क्षेत्रातून शकील जाफरी यांना मिळालेल्या हा सन्मानाचा सर्वांकडून कौतुक होत आहे.

Attachments area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here