मंञालयात नोकरी लावण्याचे आमिष गुन्ह्यात राहुरीतील खंडाबे येथिल तरुणाला अटक ;पोलिस नागराज मंजुळेंची करणार चौकशी !

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

         मंत्रालयात नोकरी लावतो असे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाच्या प्रकरणात राहुरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.  मराठी चिञपट सृष्टीत सर्वञ गाजलेला सैराट या चित्रपटातील प्रिन्सची भूमिका साकारणारा सूरज पवार हा पोलिसांच्या रडारवर लवकरच राहुरी पोलिस त्याच्या मुसक्या आवळणार आहेत.मंञालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखविण्यासाठी बेरोजगार तरुणाचे सावज शोधणारा राहुरी तालुक्यातील खंडांबे येथील विजय बाळासाहेब साळे या तरुणास पोलिसांनी गुरवारी राञी ताब्यात घेतले.मंञालयात नोकरी लावण्यासाठी किती सावज शोधुन दिले याचा शोध पोलिस घेत आहेत. 

              <p> याबाबत पोलिस सुञाकडून समजलेली माहिती अशी की मंञालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.आता पर्यंत पोलिसांनी दत्तात्रय क्षीरसागर, आकाश शिंदे व ओंकार तरटे या तिघांना अटक केली. यांच्या कडून पोलिस तपासात मिळालेल्या माहिती नुसार नोकरीचे आमिष दाखविण्यासाठी सावज शोधुन त्याची आर्थिक व परीपुर्ण माहिती गोळा करुन देण्याचे काम राहुरी तालुक्यातील खंडांबे विजय बाळासाहेब साळे (वय-३१) हा तरुण करीत असल्याचे तपासात समोर आले. गेल्या तीन तेचार दिवसा पासुन त्याचा पोलिस शोध घेत होते. पोलिसांनी दिवसा व राञी घरी या तरुणाचा शोध घेतला पण मिळाला नव्हता. पोलिसांच्या खबऱ्या मार्फत माहिती मिळविली असता.पोलिसांनी विजय साळे या तरुणाच्या घरा पासुन काही अंतरावरील कपाशीच्या पिकात राञभर जागुन काढली.परंतू सावज शोधणारा आरोपी आलाच नाही.गुरवारी राञी पोलिसांनी पुन्हा सापळा रचला राञी 11 वा.सुसाट वेगाने एक मोटारसायकल साळे वस्तीवर आली. मोटारसायकल सेडमध्ये लावून त्यावर साळे याच्या पत्नीने लाकडे टाकून झाकून ठेवली.साळे घरात जेवणाच्या ताटावर बसलेला असताना पोलिसांनी झडप घालुन विजय साळे याच्या मुसक्या आवळल्या नोकरीचे आमिष दाखविण्यासाठी सावज शोधणारा पोलिसांच्या ताब्यात आल्याने किती तरुणाची फसवणूक झाली याची माहिती पुढे येणार आहे.

                 नेवासा येथील महेश वाघडकर याने फिर्याद दिल्यानंतर मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे उकळणारे  दत्तात्रय क्षीरसागर, आकाश शिंदे व ओंकार तरटे या तिघांना अटक केली होती.याच गुन्ह्यात राहुरी तालुक्यातील खंडांबे येथील विजय साळे हा चौथा आरोपी अटक केली आहे. फसवणूक प्रकरणात आरोपींची संख्या वाढत चालली असुन सैराट चिञपटातील प्रिन्स तथा सुरज पवार याचा शोध पोलिस घेत आहे.

           राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्य मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा, पो.काँ.शशिकांत वाघमारे,गणेश लिपणे हे अधिक तपास करत आहे. या फसवणूक प्रकरणात आरोपींची संख्या वाढत असल्याने मोठं रॅकेट उघडकीस होणार असून अनेकांची नावे यात समोर येण्याची शक्यता आहे.

चौकट 

सैराटचे नागराज मंजुळे अडकणार चौकशीच्या फेऱ्यात

            सैराट चित्रपटातील आर्चीचा भाऊ  प्रिंन्स (सुरज पवार) याचा नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरणात समावेश असुन तो  संगमनेरात आला होता. त्याने बनावट शिक्के तयार करणाऱ्याला भेटून आम्हांला चिञपटाच्या शुटींगच्या कामासाठी हे शिक्के लागतात असे सांगून नागराज मंजुळे यांचेशी भ्रमणभाष वरुन बोलणे करून दिल्याचे आरोपीनी सांगितले आहे.त्यामुळे सैराटचे नागराज मंजुळे  चौकशीच्या फेऱ्यात अडकणार असुन या प्रकरणात मंजुळेंचा सहभाग असल्यास आरोपी म्हणून त्यांना हि या गुन्ह्यात घेतले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here