मंत्रिमंडळाचा विस्तारासाठी भाजप युतीचे आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत : एकनाथ खडसे

0

जळगाव : शिंदे फडणवीस सरकारमधील आमदार हे मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत असून मंत्रिमंडळाच्या विस्ताराला जसजसा उशीर होतोय, तसतशी अस्वस्थता वाढू लागली आहे. आता ही अस्वस्थता उघडपणे बाहेर पडत असून मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार यासाठी सर्व आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत, टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. तर गिरीश महाजनांनी एक हजार कोटींचे काम रद्द केल्याने सर्वपक्षीय आमदारांमध्ये नाराजी असल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले.
काँग्रेसचे अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड झाली आहे. यांनी व्हिडीओ एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसवर नेहमी घराणेशाही, तसेच काँग्रेस घराणेशाहीने बरबटली असा आरोप होत होता. मात्र आता तब्बल 24 वर्षानंतर काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड झाल्यामुळे काँग्रेस पक्ष आता सक्षम होईल, अशी अपेक्षाही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी भुसावळ नगरपालिकेतील नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई केली, खडसे यांचा आरोप

भुसावळ नगरपालिकेतील खडसे समर्थक माजी नगराध्यक्षांसह दहा नगरसेवकांवर सहा वर्षासाठी अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याने एकनाथ खडसे यांना राज्य सरकारचा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी नगरपालिकेतील सदस्यांना अपात्रतेची कारवाई केली असून याप्रकरणी शासनाकडे दाद मागितली. मात्र मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी अपेक्षेप्रमाणे निर्णय दिल्याची खोचक टीका एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.
जिल्हा दूध संघ प्रकरणात पोलिसांना स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नाही. पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीत आरोपी म्हणून घोटाळ्यास जबाबदार सर्वांचा उल्लेख केला आहे. मग यात दूध संघाचे सर्व पक्षीय संचालक यांचा ही समावेश होतो का? म्हणजेच हा सर्व पक्षीय घोटाळा आहे, असं म्हणायला हरकत नाही, असेही मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here