मतदानकार्ड सोबत आधारलिंक तात्काळ करुन घेणेबाबत नागरीकांना केले आवाहन
जामखेड तालुका प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे जामखेड तालुक्यातील मोहा येथील निवारा बालगृह येथे आयोजित भटक्या विमुक्त जमातीच्या राज्यस्तरीय महिला परिषदेला उपस्थित होते.सदर ठिकाणी त्यांनी परिषदेला निवडणूक विषयक बाबिसंदर्भात मार्गदर्शन केले. लोकशाहीचा पाया बळकट करनेसाठी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन या प्रसंगी केले.तसेच भटक्या विमुक्त समाजासाठी गावोगावी कॅम्प घेऊन त्यांची मतदार नोंदणी सुलभ करण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकारी यांना दिल्या. <p>याप्रसंगी समाजकल्याण आयुक्त नारणवरे यांनी परिषदेस विविध योजनेबाबत मार्गदर्शन केले. सदर दौऱ्यादरम्यान कर्जत जामखेड मतदार संघाच्या निवडणूक कामकाजाची माहिती घेतली. या वेळी कर्जत जामखेड तालुक्यातील कामकाजाबाबत उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले , तहसिलदार योगेश चंद्रे, तहसीलदार नानासाहेब आगळे, निवडणुक नायब तहसिलदार मनोज भोसेकर यांचे अभिनंदन केले. तसेच तालुक्यातील मतदान कार्ड सोबत आधार लिंकींगचे १०० टक्के कामकाज करणारे बीएलओंचे प्रमाणपत्र देऊन सत्कार केले जामखेड तालुक्यातील रोडे बाळासाहेब दत्तात्रय,बोराडे निलेश रमेश,हजारे विकास बाळकृष्ण,घोडके संदीप गेना, बाबाजी राघू दातीर, पवार अविनाश जालिंदर,होडशील प्रभाकर,गाढवे रामचंद्र आजीनाथ,कुलकर्णी अनिल भानुदास,कात्रजकर गणेश चंद्रकांत तसेच कर्जत तालुक्यातील झावरे सचिन सीताराम, टकले सुनील मुरलीधर,उंडे संतोष मच्छिन्द्र,भवर भारत आनंदा,झगडे अनिलकुमार आबासाहेब,उधाने अमोल दिनकर,सटाले , जेवे दिनकर लक्ष्मण,खोत रामचंद्र दादासाहेब,बिरादार अमित मेहताब,टकले रंगनाथ देविदास यांनी १०० टक्के काम केले त्याबाबत त्यांनी त्यांचे अभिनंदन केले