
उरण 18(विठ्ठल ममताबादे ) शासकीय शाळेतील विद्यार्थी पटसंख्या हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे.महाराष्ट्र राज्यातील 0 ते 20 विद्यार्थी पट संख्या असलेल्या सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.सदर निर्णय त्वरित मागे घेण्या बाबत मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेड उरण-रायगड यांनी उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष ॲड.इंजि. शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर व संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष ॲड. शिवश्री मनोजदादा आखरे यांच्या आदेशा नुसार रायगड जिल्हा महासचिव – शिवश्री समीर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.त्यांच्या मते शासकीय शाळेत गरिब विद्यार्थि शिक्षण घेत आहेत.असे असताना शिक्षणाचा दर्जा वाढवीणे व पटसंख्या वाढविणे हि उपाययोजना करायची सोडून शासन सरळ शाळाच बंद करण्याचा निर्णय घेत आहे .हे चूकीचे असून गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याची शासनाची स्पष्ट इच्छा दिसत आहे.
यावेळी उरण तालुका अध्यक्ष – शिवश्री जितेश पाटिल,पनवेल तालुका महानगर अध्यक्ष – शिवश्री चेतन मुंडकर,उरण तालुका उपाध्यक्ष -शिवश्री चंदन कडू,उरण तालुका महासचिव – शिवश्री साहिल कडू, उरण तालुका संघटक – शिवश्री अमोल पाटील, शिवश्री भावेश शेळके व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.