मला ही तुम्ही मातंग समाजाचा समजा  – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

0

मुंबई : सामाजिक, आर्थिकदृष्ट्या विकासात मागे राहिलेले अनेक समाज आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. मी अतिशय संघर्ष करुन येथे पर्यंत आलो आहे.मला ही खुप संघर्ष करावा लागला आहे.वंचित समाजासारखाच संघर्ष मला येथे पर्यंत करावा लागला आहे. त्यांमुळे मला ही तुम्ही मातंग समाजाचा समजा.  अलीकडच्या काळात  मातंग समाजात देखील मोठे परिवर्तन होत असून, समाजातून अनेक साहित्यिक व कलासंपन्न लोक पुढे येत आहेत. या समाजाची अशीच प्रगती झाल्यास त्यातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच ज्यांचे साहित्य जगभर वाचले जाते असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांसारखे महापुरुष निर्माण होतील, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.मातंग साहित्य परिषदेच्या वतीने राजभवन, मुंबई येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते साहित्य, लोककला व समाजसेवा क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना ‘मातंग समाजमित्र’, ‘मातंग समाजरत्न’ व ‘विशेष सन्मान’ प्रदान करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. गेल्या काही वर्षांमध्ये समाजातील मागासवर्गीय लोकांच्या विकासासाठी देशात कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक घरी वीज, शौचालय व नळाचे पाणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे मातंग समाजासह सर्व मागास समाज घटकांचा विकास होऊन त्यातून सक्षम नेतृत्व पुढे येईल, असा आशावाद राज्यपालांनी व्यक्त केला.तर” देशाचे सांस्कृतिक नेतृत्त्व हे मातंग समाज व अनुसुचित जातीने केले पाहिजे ” असे मत डॉ. रमेश पांडव व्यक्त केले तर हभप शिवाजीराव मोरे यांनी ‘मातंग साहित्य परिषदेची ही वाटचाल सामाजिक ऐक्याच्या दृष्टिने महत्त्वपुर्ण वाटते.”

     राज्यपालांच्या हस्ते यावेळी ह.भ.प. भगवानबाबा आनंदगडकर व भटक्या विमुक्त जमाती आयोगाचे अध्यक्ष, दादा इदाते यांना मातंग समाजमित्र पुरस्कार देण्यात आले. तर साहित्यिक चंद्रकांत वानखेडे यांना विशेष कार्याकरिता मातंग समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. विशेष कार्याबद्दल प्राचार्य अरुण आंधळे, साहित्यीक राजन लाखे, डॉ. अशोक कांबळे,समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष: प्रा. ईश्वर नंदापुरे, मा.सुनील वारे,मुंबई विद्यापीठाच्या युरेशियन स्टडीचे प्रमुख:मा.डॉ.संजय देशपांडे, शाहीर नंदेश उमप, लोकगायिका राधा खुडे,शाहीर संजय साठे,लोकगायक संजय ठोसर,बालशाहीर आविष्कार एडके,आदींना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर हभप शिवाजीराव मोरे, डॉ. रमेश पांडव, व मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे उपस्थित होते.तर

यावेळी महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, समाजकल्यान आयुक्त प्रशांत नारनवरे,समरसता प्रांत कार्यकारणी सदस्य निलेश गद्रे,हेमंत हरहरे,माजी आमदार राम गुंडिले,ललो.अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे,दिवाकर कुलकर्णी,शंकर तडाखे,अनिल सौंदडे,डॉ.संजय गायकवाड,डॉ.राजकुमार म्हस्के,अशोक लोखंडे,दादामहाराज पाटोळे, इत्यादीसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून २५०लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.याप्रसंगी  कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.धनंजय भिसे यांनी केले तर  आभार डॉ.अंबादास सगट यांनी मांडले.सुत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here