महाड-सातारा-नागपूर संविधान रॅली सुरु ! आज साताऱ्यात धडकणार !!

0

सातारा/अनिल वीर : महाडपासून दि.२१ आक्टोबर पासून सुरू झालेली संविधान रॅली दि.२६ नोव्हेंबर रोजी (संविधान दिन) नागपूर येथे पोहचणार आहे.प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी  संविधान रॅली काढण्यात आली आहे.त्यामुळे सातारा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भेट देऊन अभिवादन करणार आहेत.

 वेळापत्रकानुसार ही रॅली शहरात येत आहे.संविधान प्रचार मोहीम रॅलीचे स्वागत करून आपण आपल्या शहराच्या मुख्य  ठिकाणी, म्हणजेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून रॅलीला पदयात्रेच्या माध्यमातून घेऊन जायचं आहे.याच ठिकाणी संविधान जागृतीची प्रचारसभा होईल. शहरात रॅलीचे आगमन होईल.तेव्हा धम्मबांधव व संविधानप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपले योगदान द्यावे.असे आवाहन संविधान समर्थक समूहाने केले आहे.

फोटो : बाबासाहेबांच्या याच पुतळ्यास अभिवादन …..(छाया-अनिल वीर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here