महात्मा गांधीच्या विचारशैलीचा आदर करा : प्रा.एस.बी.देशमुख

0

पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन सिन्नर : पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विद्यालयात वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातील उत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिक देतांना मुख्याध्यापक व संस्थेचे सेक्रेटरी एस.बी.देशमुख यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधीच्या अंगी असणाऱ्या गुणांचा अंगिकार करून भविष्यात खूप मोठे व्हावे व लाल बहादूर शास्त्री सारखी जिद्द व चिकाटी अंगीकारून महान बनावे,शांतता अंगी बाळगून आपले कार्य तडीस न्यावे असे प्रतिपादन केले .
विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ.सविता देशमुख यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधीजीच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली आपल्या जीवनात महान व्यक्तीचे जीवन कार्य व त्यांचा त्याग आपल्या ध्यानी ठेवून आपणही आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून आपण अभ्यास नियमित करून व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.सत्य,अहिंसा,सर्वधर्म समभाव या गुणाची जोपासना करावी असे सांगितले. महात्मा गांधींच्या जीवन चरित्रावरती माहिती सांगून विद्यार्थ्यांनी त्यांचे गुण अंगीकारावे व जीवनात यशस्वी व्हावे.
तसेच श्रीमती सी.बी.शिंदे यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या “जय जवान जय किसान” या मंत्राप्रमाणे आपणही आपल्या देशासाठी देशसेवेचा वसा जतन करावा असे सांगितले.याप्रसंगी वकृत्व स्पर्धेतील सुजल शिंदे, करण रेवगडे, दर्शन वारुंगसे,रितेश रेवगडे,आदित्य भोर,वैष्णवी शिंदे,रोहन जाधव, नितांशु शिंदे,सायली रेवगडे,पूनम बोगीर,श्याम रेवगडे,रितेश रेवगडे,समिक्षा रेवगडे,साहिल पोरजे,अविनाश रेवगडे अनुज शिंदे,साहिल रेवगडे,ज्ञानेश्वरी वारुंगसे,सायली शिंदे,अरुण रेवगडे,स्वरांजली पाटोळे, माया रेवगडे ऋतुजा जाधव काजल बोगीर,या विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट वकृत्व केल्याबद्दल सुजल शिंदे, पुनम बोगीर,दर्शन वारुंगसे,शिवम रेवगडे यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष टी.के.रेवगडे,बी.आर.चव्हाण,आर.व्ही.निकम,एस.एम. कोटकर,आर.टी.गिरी,एम.सी.शिंगोटे, एम.एम.शेख, सविता देशमुख,सी.बी.शिंदे,के.डी.गांगुर्डे,एस.डी.पाटोळे, आर.एस.ढोली, ए.बी.थोरे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here