महापुरुषांच्या विचारांवर समाज समृद्ध होईल : संगीता धोत्रे

0

सातारा : बाबासाहेबांच्या पत्नी रमाई यांच्या माहेरी वनंद येथे भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने संरक्षक महाउपासिका मिराताई यांनी स्मारकाचे काम केले. शिवाय, सभागृहाचे काम तत्कालीन आमदार भाई गिरकर यांनी दत्तक घेतलेले गाव म्हणून पूर्ण करून दिले.तेव्हा महापुरुषांच्या विचारांवर वाटचाल करावी.तरच खऱ्या अर्थाने समाज समृद्ध होईल.अशी माहिती माता रमाईच्या नातसून संगीता धोत्रे यांनी दिली.

   वनंद, ता.दापोली,जि. रत्नागिरी येथे अनिल वीर यांनी कुटुंबियासमवेत भेट दिली.तेव्हा स्मारकमध्ये झालेल्या सहविचार सभेत धोत्रे मार्गदर्शन करीत होत्या. माता रामाईचे वडील भिकू धोत्रे यांनी सुमारे २० किमी अंतरावर चालत जाऊन हर्णे बंदरावर मच्छीच्या टोपल्यांची वाहतूक केली.रामाईच्या मातेचा मृत्यू लवकर झाल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी भिकू धोत्रेनीच पेलली होती.त्यांचे कष्ट व त्यांच्या परिवाराबद्धल सविस्तर माहिती अनेक उदाहणासह  संगीताताई धोत्रे यांनी कथन केली. प्रारंभी माता रामाईसह बाबासाहेब व बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. दीपप्रज्वलनासह संपूर्ण विधी सामुदायिक घेण्यात आला.दरम्यान,चैत्यभूमी येथीलभन्ते बी.संघपाल महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य बौद्धाचार्य-श्रामनेर प्रशिक्षण चालू असलेल्या ठिकाणीही अनिल वीर यांनी भेट देऊन महासभेच्या कार्याबद्धल माहिती जाणून घेतली.संगीताताई धोत्रे यांनी ऐतिहासिक उदाहरणे देत गायनाच्या माध्यमातून अप्रतिम असे स्वागत केले.विनिता धोत्रे यांनी आभारप्रदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमास सौ. वैशाली वीर,कु.अनुला वीर, कु.प्रतीक्षा मोरे,अनिरुद्ध वीर आदी ग्रामस्थ, उपासक – उपासिका उपस्थित होत्या.

फोटो : अभिवादन करताना संगीता धोत्रे,अनिल वीर व परिवार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here