महामानवांच्या प्रती श्रद्धा अर्पण केल्याने पुण्यकर्म प्राप्त होते.

0

सातारा : बुद्धाला जो शरण जातो. तोच क्रोद्धावर नियंत्रण ठेवू शकतो.तेव्हा बुद्ध,आंबेडकर, फुले,शाहु आदी महामानव यांच्या प्रति श्रद्धा अर्पण केल्यास मानवास खऱ्या अर्थाने पुण्यकर्म प्राप्त होते.असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षक भागवत भोसले यांनी केले.

    येथील मिलिंद कॉलनीमधील सभागृहात १० दिवसीय श्रामनेर शिबिर सुरू झालेले आहे.त्यांनी सौ.संगीता मंगेश डावरे यांच्या निवासस्थानी वर्षावास चालु होता.तेव्हा भेट दिली.तेव्हा भोसले मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने,धम्मबांधव उत्सव कमिटीचे अध्यक्ष शामराव बनसोडे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

     भागवत भोसले म्हणाले, “धम्माप्रमाणे आचरण केले तर खऱ्या अर्थाने सुख, शांती व समृद्धी प्राप्त होत असते.”

    मुरलीधर खरात यांनी भ.गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन केले तर त्याचा अर्थ बी. एल.माने यांनी सांगितला. श्रामनेर व भिक्खू संघ याबाबतही माहिती माने यांनी दिली.महापुरुष यांच्या प्रतिमेस डावरे परिवारांने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रफुल डावरे व विपुल डावरे यांनी परिवारासह पूजन केले.

    सदरच्या कार्यक्रमास भन्ते कौंडिण्य,संघानंद,धम्मनंद,विश्वजित,धम्मतीस,गुणरत्न,अशोक कीर्ती,धम्मप्रिय आदी श्रामनेरसह डॉ.आदिनाथ माळगे, प्राचार्य मोहन शिर्के, तुकाराम गायकवाड, माणिक आढाव, संजय नितनवरे, अशोक भोसले, श्री.व सौ.विलास कांबळे, शाहिर प्रकाश फरांदे, संरोष मोरे,प्रकाश तासगावकर, नवनाथ लोंढे,अनिल वीर, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या. नंदकुमार काळे यांनी आभार मानले.

फोटो : मार्गदर्शन करताना भागवत भोसले,समोर श्रामनेर, उपासक व उपासिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here