उरण दि. 23 (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सक्रिय कार्यकर्ते सतिश बिपिन पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (ट्रेलर /मल्टी एक्सल यूनिट) चिटणीस पदी करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र वाहतूक सेना अध्यक्ष संजयभाई नाईक यांनी पनवेल मधील जेष्ठ नागरिक हॉल मध्ये कार्यक्रम दरम्यान सतिश पाटील यांना दिले.यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, वाहतूक सेना सरचिटणीस प्रदीप वाघमारे आदि मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज वाहतूकदारांना खंबीर नेतृत्वाची गरज असून त्यांची विश्वासहर्ता जपणे अत्यंत महत्वाची बाब आहे. मी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवतेने मा. राजसाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारी वाहतूक सेना उभाराण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पुढील कार्यात वाहतूक दारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढत राहणार असल्याचे यावेळी सतिश पाटील यांनी सांगत सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे यावेळी त्यांनी आभार मानले. सतिष बिपीन पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या (ट्रेलर /मल्टी एक्सल यूनिट) चिटणीस पदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.