महाविद्यालयीन विद्यार्थीनी व विवाहीत महिलेची छेड काढल्यावरुन तरुणा विरोधात दोन स्वतंञ गुन्हे दाखल

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

                     शाळा महाविद्यालयातील विद्यार्थींनीचा पाठलाग करुन छेडछाड करण्याच्या घटना दिवसेंन दिवस वाढत आहे.राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथिल तरुणाने दोन विद्यार्थीनींची छेड काढल्यावरुन विशाल दत्तात्रय नेहे या तरुणा विरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी विद्यार्थींनी मधील नवचंडीका जागी झाल्यामुळे या तरुणीं स्वतः पुढे येवून फिर्याद दिल्याने रोड रोमीओचा बंदोबस्त करणे सोपे होणार आहे.

               याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरवारी  महाविद्यालयीन दोन तरुणींची छेड काढण्यात आली.या दोन्ही तरुणीनी हा प्रकार घरी सांगितला. या घटनेतील पहिली तरुणी राहते घरासमोर भांडी धुत असताना त्यांच्याकडे देवळाली प्रवरा येथिल  महादेव चौधरी हे कामानिमित्त आले होते.फिर्यादी यांच्या घरासामोरील रस्त्यावर उभा राहुन छेडछाड करीत होता. विशाल दत्तात्रय नेहे या तरुणाने  मी शाळेत जात असताना पाठलाग करून माझा हात पकडुन मला फोन नंबर मागितला. घरासमोरुन चकरा मारत असतो असे त्या विद्यार्थींनीने आपल्या आईस सांगितले.फिर्यादी महिलेने त्यास जाब विचारला असता त्याचा  राग आल्याने नेहे या तरुणाने फिर्यादी त्यांची मुलगी व महादेव चौधरी यांना शिवीगाळ करून लाथाबुवकयाने मारहाण करून तुम्ही माझ्या  नादी लागू नका नाहीतर एक एकाचा काटा काढुन टाकील अशी धमकी दिली.
               दुसऱ्या एका घटनेत विशाल दत्ताञय नेहे या तरुणाने फिर्यादी महिलेस शिवीगाळ दमदाटी करुन करुन बाजारात व मुलांना शाळेत सोडण्यासाठी व घेण्यासाठी जात अस्तांना  पाठलाग करुन  वाईट नजरेने पाहुन घरी असतांना शिवीगाळ करुन तु मला फार आवडते  तु माझ्या सोबत संबध का ठेवत नाही असे म्हणुन एक हात त्याने दोन्ही हाताने पकडुन फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

                  राहुरी पोलिस ठाण्यात प्रथमच एकाच तरुणा विरोधात दोन महिलांची फिर्याद दाखल करुन दोन स्वतंञ गुन्हे दाखल केले आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ज्योती डोके, एस व्ही खरात हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here