संगमनेर : भारताच्या माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या ३८ व्या पुण्यतिथी निमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सोमवार (दि.३१) ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता अमृत उद्योग समूहाच्या वतीने पुष्पांजली अर्पण व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांनी दिली.
माजी महसूलमंत्री तथा काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ गटनेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत व विधान परिषदेचे सदस्य आ.डॉ.सुधीर तांबे यांचे अध्यक्षतखाली होणाऱ्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बाबा ओहोळ यांनी केले आहे.
बालवयापासूनच स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेवून देशाच्या एकात्मतेसाठी व अखंडतेसाठी बलीदान देणाऱ्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन दरवर्षी अमृत उद्योग समूहाच्या वतीने कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजीत केला जाातो. सोमवार दि ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता ”शक्तीस्थळ ” येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या वेळी प्रियदर्शनी भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान होणार आहे.या कार्यक्रमासाठी बाजीराव पाटील खेमनर,ॲड माधवराव कानवडे,नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख,सत्यजीत तांबे,तालुका कॉग्रेस अध्यक्ष मिलींद कानवडे,लक्ष्मणराव कुटे,सभापती सौ सुनंदाताई जोर्वेकर,सौ.मिराताई शेटे,नवनाथ अरगडे,अमित पंडीत,शंकरराव खेमनर,संपतराव डोंगरे, आर.एम.कातोरे,हौशीराम सोनवणे,सुरेश थोरात,सुधाकर रोहम,सौ अर्चनाताई बालोडे,सौ निर्मलाताई गुंजाळ, सोमेश्वर दिवटे,निखील पापडेजा, प्रा.बाबा खरात,राजेंद्र गुंजाळ,राजेंद्र कडलग, गणपतराव सांगळे व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी मोठया संखेने उपस्थित रहावे असे अवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे,सर्व संचालक मंडळ,कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.