संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह साखर कारखान्याच्या सन २०२२ – २०२३ या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या रविवार दि. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ गटनेते आ. बाळासाहेब थोरात व सौ कांचनताई बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते होणार आहे. आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येनेेे उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी केले आहे.
राज्याचे माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सर्वाधिक भाव देणारा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना देशातील अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जात आहे. या कारखान्याने सहकार महर्षी स्व.भाऊसाहेब थोरात यांची कडवी शिस्त, काटकसर,पारदर्शकता व उत्कृष्ट व्यवस्थाापनाचे नेहमीच पालन केले आहे. त्याचबरोबर आ. बाळासाहेब थोरात यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे या साखर कारखान्याने देशात आदर्श निर्माण केला आहे.या ऊस गळीत हंगाम शुभारंभाप्रसंगी ज्येष्ठ नेते बाजीराव पा खेमनर,ॲड माधवराव कानवडे, सौ.दुर्गाताई तांबे,सत्यजीत तांबे,रणजितसिंह देशमुख,इंद्रजित थोरात,डॉ.जयश्रीताई थोरात, सौ.सुनंदाताई जोर्वेकर,,सौ.मिराताई शेटे,शंकर पा. खेमनर,लक्ष्मणराव कुटे,राजेश मालपाणी,संपतराव डोंगरे,विश्वासराव मुर्तडक,अमित पंडित,रामहरी कातोरे,हौशीराम सोनवणे,राजेंद्र गुंजाळ,अजय फटांगरे,मिलींद कानवडे, भाऊसाहेब एरंडे,राजेंद्र कडलग,ॲड.सुहास आहेर,निलेश जाजू,माधवराव हासे,सुधाकर रोहम,सुरेश झावरे, सौ निर्मलाताई गुंजाळ,उबेद शेख,सौ अर्चनाताई बालोडे,सोमेश्वर दिवटे,सुभाष सांगळे,प्रा बाबा खरात, सौ प्रमिलाताई अभंग,निखील पापडेजा,गौरव डोंगरे,निलेश थोरात,जावेद तांबोळी,आनंद वर्पे,संजय कोल्हे, हैदर अली,जीवन पंचारीया,जावेद शेख,जयराम ढेरंगे,दत्तात्रय राऊत आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी या कार्यक्रमासाठी सर्व सभासद, ऊस उत्पादक व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे सर्व संचालक व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.
Home महाराष्ट्र माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उद्या थोरात सहकारी साखर कारखान्याचा ऊस...