मायगांवदेवीत दहा लाख रूपये खर्चाच्या सामाजिक सभागृहाचे कोल्हेंच्या हस्ते लोकार्पण

0

कोपरगांव :- दि. २७ सप्टेंबर २०२२

         शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधुन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी त्यांच्या कार्यकाळातील मायगांवदेवी येथे जगदंबा माता मंदिराशेजारील दहा लाख रूपये खर्च करून नव्याने उभारण्यांत आलेल्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण सोमवारी केले. 

         यानिमीत्ताने त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यांत आले. नवरात्रात घटी बसणा-या भाविकांसाठी पत्रा शेड उपलब्ध करून दिल्याबददल गांवच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यांत आला. प्रारंभी जयराम गडाख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 

         सौ. स्नेहलताताई कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाल्या की, कोपरगांव मतदार संघातील शहर आणि ग्रामिण विकासाचे असंख्य प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करून त्यांस मंजुरीसह निधीची उपलब्धता केली आहे. ग्रामिण भागात गेल्या तीन वर्षापासुन कोरोना परिस्थितीमुळे धार्मीक उत्सव साजरे करण्यावर बंधने होती पण आता ही परिस्थिती पुर्वपदावर आल्याने नवरात्र काळात घटी बसणा-या महिलांचे प्रमाण जास्त आहे. इर्श्वराचा ध्यास आणि भक्ती प्रत्येक कार्यात महत्वाची आहे त्याचे बळ जनविकासाच्या कामाला मिळत असते. याच उर्जेने प्रलंबित कामाची पुर्तता करून पुढे जाण्यासाठी आदिशक्ती जगदंबा मातेकडे विकासरूपी आर्शिवाद मागत असल्याचे त्या म्हणाल्या. याप्रसंगी सरपंच दिलीपराव थोरात, उपसरपंच मुकूंदराव गाडे, सर्वश्री. प्रभाकर गाडे, श्रीकृष्णा गाडे, सुदामराव गाडे, अशोक बैरागी, सखाहरी खर्डे, भगिरथ गाडे, संपत ढोमसे, जयसिंग गाडे, प्रविण भुसारे, सुदाम गाडे, अकबर शेख, भारत कासार, रणजित भगत, अशोक भगत, पुंजाराम भगत, दशरथ भगत, राहुल गाडे, बाबासाहेब गाडे, मच्छिंद्र भवर, विजय वर्पे, नवनाथ भवर यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, मायगांव देवी पंचक्रोशीतील रहिवासी, भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी शरद गडाख यांनी आभार मानले. 

फोटोओळी-कोपरगांव 

        तालुक्यातील मायगांव देवी येथे दहा लाख रूपये खर्चाच्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते झाले. 

(छाया-जय जनार्दन फोटो, संजीवनी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here