मुंबई कंट्रोलकडून मिळाली नान्नजमध्ये बॉम्ब असल्याची खबर 

0

बॉम्ब शोध पथक नान्नजमध्ये दाखल तपासाअंती निघाली अफवा

नान्नजला बॉम्ब च्या अफवेने नान्नज परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण 

एलटी मार्ग मुंबई पोलीसांनी आरोपीला मुंबई मध्ये केले अटक 

जामखेड तालुका प्रतिनिधी – (समीर शेख) जामखेड तालुक्यातील नान्नज येथील बालाजी मेडिकलमध्ये ६ बॉम्ब ठेवले असल्याची खबर मुंबई  पोलीस कंट्रोलला मिळाली, तातडीने तपास यंत्रणांनी बॉम्बशोधक पथकासह जामखेड तालुक्यातील नान्नज गाठले मात्र तपासाअंती ही अफवा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दि. १८ रोजी दिवसभर बॉम्बच्या चर्चेने नान्नज व परिसरात गाव पुर्ण भितीच्या दहशती खाली होते. ही अफवा दिनेश सुतार या व्यक्तीने पसरवली होती. आता पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. 

सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील नान्नज येथील बालाजी मेडिकल या दुकानात बॉम्ब ठेवल्याची खबर मुंबई कंट्रोलच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून रविवारी (दि. १८ ) सकाळी दहा वाजता मिळाल्यानंतर जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात,  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भोस, पोलिस कॉ.आबा आवारे, सतीश दळवी, नवनाथ शेकडे हे फौजफाट्यासह बालाजी मेडिकलजवळ सकाळी दहा वाजता दाखल झाले. जामखेड पोलिसांनी दिवसभर बालाजी मेडिकलसह परिसराची तपासणी करून तेथे लक्ष केंद्रित केले.सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास नगर येथील बॉम्बशोधक पथक व निकामी करणाऱ्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक मुरकुळे, हवालदार एस.सी. येटेकर, पोलिस नाईक सतीश तवार, उमेश मोरे, दिनेश पळलकर, अंकुश कुलांगे, कॉन्स्टेबल गौरव भिंगारदिवे, देविदास शेंडे, रोहित कांवळे, अरुण गायकवाड, गडदे आदी नान्नजमध्ये दाखल झाले.      

   पोलीस फौजफाटा येताच नान्नज गावात नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. मेडिकलसह संपूर्ण परिसराची या पथकाने तपासणी केली. डॉग स्क्वॉडमधील जंजीर या श्वानाने संपूर्ण परिसर पिंजून काढला.

मात्र पथकास बॉम्ब सदृश कोणतीही वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे ही अफवाच असल्याचे निष्पन्न झाले. 

 दरम्यान गावातील बालाजी मेडिकलमध्ये सहा बॉम्ब ठेवल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी मेडिकल परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते 

आरोपी दिनेश सुतार याच्या वर दहा दिवसांपुर्वी जामखेड पोलीस स्टेशनला विनयभंगचा गुन्हा दाखल झालेला आहे याचा जामखेड पोलीस शोध घेत होते मात्र तो वारवांर जागा बदलत असत पोलिसांना गुंगारा देत होता मात्र आरोपी दिनेश सुतार याला एलटी मार्ग मुंबई पोलिसानी अटक केले असुन लवकरच आरोपीला जामखेड पोलीस ताब्यात घेणार आहे 

या नुसार सहाय्यक फौजदार शिवाजी दशरथ भोस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनेश सुतार, रा.पत्ता माहित नाही( मो नं ७५१७३३६९१७) याचे विरूद्ध गु.रजि.नं. व कलम :- I ४३९/२०२२ भा.द.वि. कलम १७७,१८२,५०५(१)( बी) प्रमाणे

गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास जामखेड पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here