मुकेश अंबानीचे सुपुत्र अनंत अंबानी यांची साईबाबा चरणी १.५१ कोटी रुपयांची देणगी !

0

शिर्डी : देशातील सर्वात श्रीमंत प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी आज दिवाळीच्या मुहूर्तावर शिर्डीत साई चरणी हजेरी लावली. आज सकाळी त्यांनी साई बाबा मंदिरात जाऊन साई संधीचे दर्शन घेतलं. दर्शनानंतर अंबानी यांनी साई बाबा संस्थानला तब्बल १.५१ कोटी ( एक कोटी एक्कावन्न लाख रुपये) रुपयांची देणगी त्यांनी दिली. यावेळी त्यांनीमंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे त्यांनी देणगीच्या रकमेचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मंदिर समितीच्या वतीने अंबानी यांचे आभारही मानण्यात आले.

अनंत अंबानी यांनी साई बाबांच्या मध्यान्ह आरतीचा हजेरी लावली होती. साई संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी अनंत अंबनी यांचं स्वागत केलं. अनंत अंबानी यांच्या शिर्डीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
या आधी ऑक्टोबर महिन्यात अनंत अंबानी यांनी शिर्डी जाण्याचा दौऱ्याचं नियोजन केलं होतं. मात्र महिन्याभरात दोन वेळा त्यांना वेगवेगळ्या कारणामुळे दौरा रद्द करावा लागला होता. अखेर त्यांनी दिवाळीचं निमित्त साधून साईनगरी जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं आणि प्रार्थना केली.

अनंत अंबानी यांनी शिर्डीज आधी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर साईंचरणी १.५१ कोटी रुपयांच्या देणगीचे धनादेश अर्पण केला. अनंत अंबानी यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
शिर्डीमध्ये दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर साई बाबांचे अनेक भक्त दर्शनासाठी येत असतात. देशभरातील भाविक शिर्डीत दिवाळीला दर्शनासाठी येत असल्यानं मोठी गर्दीही होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here