
पंढरपूर :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्याहस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव, मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलीस निरिक्षक अरुण पवार, मंदीर समितीचे लेखाधिकारी अनिल पाटील उपस्थित होते.
यावेळी प्रधान सचिव खारगे यांनी चंद्रभागा नदीपात्र व तुळशी वृंदावन या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी यात्रा कालावधीत वारकरी- भाविकांना प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती दिली. तर उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी तुळशी वृंदावनात लावण्यात आलेल्या विविध जातीच्या तुळशीबाबत व संताचे महात्मे सांगणाऱ्या भिंतीचित्राबाबत माहिती दिली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी चैत्राली वाघ व संबधित अधिकारी उपस्थित होते.