मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर राष्ट्रीय छावा संघटनेचे उपोषण मागे       

0

संगमनेर :  शहरातील बहुतांश हॉस्पिटलमधून रुंग्णाची अव्वाच्या सव्वा बिले देवून लुटमार होत असून काही हॉस्पिटल शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून शासनाला बिनदिक्कपणे फसवत आहेत. यातील अनेक हॉस्पिटलचे बांधकाम नियमाप्रमाणे नाही. तसेच काही हॉस्पिटल्स परवानगी न घेता सुरू आहेत. अशा सर्व हॉस्पिटल्सवर संगमनेर नगरपालिकेने त्वरीत कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रीय छावा संघटनेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष प्रविण कानवडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका प्रशासना विरोधात सुरू असलेले उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

          संगमनेर शहरातील विनापरवानगी नियमबाह्य बांधकाम असणाऱ्या हॉस्पिटलवर त्वरीत कारवाई करावी.डीसीपीआर नियमाप्रमाणे बांधकाम नसणाऱ्या हॉस्पिटलवर एमआरटीपी कायद्यान्वये कारवाई करावी.सर्व हॉस्पिटलच्या प्रथमदर्शनी भागावर दरपत्रक लावण्याचे आदेश करावे. सर्व हॉस्पिटलची मंजुर बेडसंख्या व प्रत्यक्षात असणाऱ्या बेडची तपासणी करून नगरपालिकेने कारवाई करावी आदी मागण्या संदर्भात राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने मंगळवार पासून उपोषण सुरू करण्यात आले होते. या उपोषणाला छावा मराठा सेनेचे प्रदेशाध्यक्ष विकास पुंड व छावा क्रांतिवीर सेनेचे आशिष कानवडे  यांनी देखील पाठींबा दिला होता.या उपोषणात राष्ट्रीय छावा संघटनेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष प्रवीण कानवडे यांचे सहित जिल्हा संपर्कप्रमुख दिनकर घुले, तालुकाध्यक्ष जालिंदर राऊत, उपाध्यक्ष मारुती सोनवणे, शहराध्यक्ष दीपक चोरमले, उपाध्यक्ष विलास रसाळ,सचिन बालोडे, कार्याध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ, वाहतूक सेना अध्यक्ष विजय पवार, वारकरी आघाडीचे वासुदेव महाराज सोनवणे , जितेंद्र मोकळ,  देविदास पवार, सचिन उगले ,राजू उदवंत, रवी साबळे, मोबीन शेख, समाधान साळवे, नाना भालेराव, राजू चरवंडे, पोपट भारसकाळ आदी उपोषणात सहभागी झाले होते. दरम्यान या संघटनेच्या मागण्यांवर कारवाई केली जाईल असे लेखी आश्वासन नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिल्यावर बुधवारी सायंकाळी हे उपोषण मागे घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here