मुधलवाडीतील तुळजाभवानी व रेणुका देवी एकत्र असलेले महाराष्ट्रातील एकमेव मंदिर

0

पैठण,दिं.२:पैठण तालुक्यातील एमआयडीसी पैठण परिसरातील  श्रीक्षेत्र मुधलवाडी येथील देवस्थानात एकाच मंदिरात दोन देवींच्या मूर्ती असलेलं राज्यातील एकमेव आगळे वेगळे देवस्थान आहे . तुळजाभवानी आई तेलाची तर दुसरी रेणुका माता शेद्राची  एकाच मंदिरात वसलेल्या आहेत . शिवाय दोन मारुतीच्या मूर्ती ही एकाच मंदिरात या गावात आहेत हे  विशेष आहे .

    दरवर्षी सातव्या माळेला  भव्य यात्रा भरते .नवरात्र उत्सवाच्या काळात हजारो भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी येतात .

श्रीक्षेत्र मुधलवाडी येथे माहूर गडाचे उपपीठ व तुळजापूरचे उपपीठ या दोन देवी मुधलवाडी येथे एकाच मंदिरात आहेत . विशेष म्हणजे महाराष्ट्रात दोन देवी एका मंदिरात असणारे एकमेव मंदिर असून या गावातील हे देवीचे मंदिर पूर्णपणे जुन्या पद्धतीने बनवलेले आहेत .कोरीव दगडाने बांधलेले आहे . मंदिराला दगडी खांबआहे .  जवळ जवळ ३०० वर्ष पुरातनमंदिर असल्याचे बोलले जात आहे . देवीच्या बाजू लाच भली मोठी दीपमाळ आहे .  समोर मोठा देवीचा होम आहे . विशेष म्हणजे या मंदिरात तील दोन्ही मुर्ति  वेगवेगळ्या आहेत . तुळजापूरची देवी माता ही तेलाची आहे .तर माहूरगडची रेणुका माता शेंद्राची या दोन देवी एकत्र असल्यामुळे याला मोठे धार्मिक महत्त्व आहे .यामुळे महाराष्ट्रातून या देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भक्तगण  गावात दर्शनासाठी येत असतात . नवरात्रीच्या काळात या मंदिरावरती विद्युत रोशनी सहमंडप उभारला जातो .धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते सकाळ संध्याकाळ महाआरती केल्या जाते . आणखी एक गोष्ट या गावची  आहे की मारुती सुद्धा एकाच मंदिरात दोन आहेत . तसेच परंपरेनुसार मुधलवाडी येथे दरवर्षी  सातव्या माळेला मोठी यात्रा भरते . तालुक्यासह परिसरातील  भावीभक्त देवीच्या दर्शनासाठी येत असतात .  पुजारी सतीश हजारे देवीची पूजाअर्चा करत असतात . . ग्रामपंचायतच्या वतीने भाविक भक्तांसाठी विविध सुविधा दिल्या जातात.रविवार रोजी सातव्या माळेला मोठी यात्रा भरली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here