मुळा नदीच्या पुराने जमिन वाहून गेल्याने, शेतकरी संतप्त

0

माजी मंञी तनपुरेंनी केली पहाणी; संरक्षण भिंत बांधण्याचे आश्वासन

देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी 

     मुळा नदीला आलेल्या पुरामुळे नदी काठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पुरात वाहून गेल्या आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट आमदार प्राजक्त तनपुरे यांचे कार्यालय गाठून संताप व्यक्त केला. आमदार तनपुरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच मुळा नदीला भेट देऊन आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या भेट घेऊन मुळा नदी काठी संरक्षण भिंत बांधण्याची आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

       वरुणराजाच्या कृपेने मुळा नदी महिनाभरापासून दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे मुळा नदी काठी असलेल्या काही शेतकऱ्यांच्या जमिनी वाहुन गेल्या आहेत. त्यामुळे संतप्त झालेले शेतकरी  नानासाहेब  कोकाटे, प्रवीण कोकाटे, हरिभाऊ उंडे, संदीप उंडे, आशाबाई हापसे,अलका कोकाटे, पुष्पाताई उंडे शालिनीताई कोकाटे,आदींनी कार्यालय गाठत प्राजक्त तनपुरे यांची  भेट घेत व्यथा तनपुरे समोर मांडल्या.

       नदीला आलेल्या पुरामुळे आमच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. काही दिवसांनी आमचे घर देखील वाहून जातील. त्यामुळे आम्हाला पाण्यापासून संरक्षण मिळावे अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली.मागणीची दखल घेऊन जमीन वाहून गेलेल्या ठिकाणी दाखल झाले. घटनेची पाहणी केल्यानंतर नदीचे सौरक्षण भिंतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावला जाईल. अशी ग्वाही तनपुरे यांनी दिली नंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांचे समाधान झाले.

     यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे व तहसीलदार एफ आर शेख यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनावरती नानासाहेब कोकाटे, हरिभाऊ उंडे, गोपीनाथ कोकाटे, सचिन म्हसे, सुरेश कोकाटे, रामनाथ हापसे, निवृत्ती ढगे, केशव कोकाटे, माधव कोकाटे, भाऊराव उंडे, दत्तात्रय येवले, गोविंद कोकाटे आदींच्या सह्या आहेत.

     यावेळी घटनास्थळी तहसीलदार एफ आर शेख, कामगार तलाठी आर एस बाचकर,माजी नगरसेवक भिकूशेठ भुजडी,युवा नेते महेश उदावंत आदी यावेळी उपस्थित होते.

चौकट

नगरपरिषदे मार्फत प्रस्ताव पाठू;तनपुरे 

                    राहुरी नगर परिषदे मार्फत संरक्षण भिंतीचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठविण्यात येणार आहे. या प्रश्नासंदर्भात लवकरात लवकर बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. व लवकरात लवकर प्रश्न निकाली काढण्यात येईल.

प्राजक्त तनपुरे माजी मंत्री तथा आमदार

मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठविणार;शेख

               मुळा नदी पाञा जवळील शेतजमिनीचे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी व कागदपत्रांची पडताळणी करून शासनाकडे अहवाल पाठविला जाईल. व ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल.

एफ आर शेख तहसीलदार राहुरी 

फोटो ओळी:

     मुळा नदीला आलेल्या पुरामुळे काही शेतकर्‍यांचे शेत पाण्यात वाहून गेले.या वेळी शेताची पाहणी करताना आमदार प्राजक्त तनपुरे समवेत तहसीलदार एफ आर शेख, माजी नगरसेवक भिकूशेठ भुजडी,युवा नेते महेश उदावंत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here